apple iphone 17 pro max: ऍपलचा इतिहासातील सर्वात वेगळा, दमदार आणि आकर्षक स्मार्टफोन?

नवीन युगाची सुरुवात करणारा apple iphone 17 pro max अफाट कॅमेरा शक्ती, डोळे दिपवणारा नवीन डिझाईन आणि झपाट्याने चार्ज होणारी बॅटरी; apple चा सर्वात हटके फोन लवकरच तुमच्या हातात!

नवी दिल्ली – जगभरात आयफोनचे चाहते दरवर्षी नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही अपवाद नाही. सप्टेंबर 2025 मध्ये अपेक्षित असलेल्या iPhone 17 Series विषयीचे अनेक लीक्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. विशेषतः apple iphone 17 pro max या टॉप-एंड मॉडेलबाबत मिळालेली माहिती पाहता, हे ऍपलचे आजवरचे सर्वात आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत डिव्हाइस ठरण्याची शक्यता आहे.

सध्या समोर आलेल्या लीकनुसार, ऍपल यंदा iPhone 17 मालिकेत चार मॉडेल्स लॉन्च करणार आहे — iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते Pro Max मॉडेल, ज्यामध्ये फोटोग्राफी, परफॉर्मन्स आणि डिझाइनच्या बाबतीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

apple iphone 17 pro max डिझाइनमध्ये नवा प्रयोग

आतापर्यंतच्या आयफोन मॉडेल्समध्ये दिसणाऱ्या चौकोनी कॅमेरा मॉड्यूलच्या जागी apple iphone 17 pro max मध्ये एक रुंद आडवा कॅमेरा बार असणार आहे, जो संपूर्ण फोनच्या रुंदीवर पसरलेला असेल. लीक झालेल्या डमी युनिटनुसार, हा कॅमेरा बंप अधिक जाडसर आणि मोठा असून, यामध्ये त्रिकौनी 48MP कॅमेऱ्यांचा सेटअप दिला जाईल. यामध्ये वाईड, अल्ट्रा वाईड आणि टेट्राप्रिझम टेलीफोटो कॅमेरे असतील. विशेष म्हणजे, हे सर्व 48MP रिझोल्युशनमध्ये असणार असून, iPhone मध्ये असा सेटअप पहिल्यांदाच पाहायला मिळेल.

8K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी तयारी

फक्त फोटो नाही, तर व्हिडिओच्या क्षेत्रातही ऍपल एक पाऊल पुढे टाकणार आहे. apple iphone 17 pro max मध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे. ही iPhone सिरीजमध्ये होणारी पहिलीच वेळ असेल. त्यामुळे ऍपलने पुन्हा एकदा प्रो लेव्हल फोटोग्राफी आणि व्हिडिओ निर्मितीसाठी स्मार्टफोन बाजारात नवा मापदंड निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे पण वाचा..oppo k13 5g भारतात 21 एप्रिलला होतोय लाँच; 7000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज

चिपसेट आणि परफॉर्मन्स

या हाय-एंड मॉडेलमध्ये ऍपलचा नवीनतम A19 Pro चिपसेट वापरण्यात येणार असून, यासोबत 12GB RAM ची जोड असेल. यामुळे गेमिंग, मल्टीटास्किंग, AI प्रोसेसिंगसारख्या गोष्टी अधिक वेगात आणि सहज करता येणार आहेत. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसला खास वॅपर चेंबर कूलिंग सिस्टम मिळणार असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे डिव्हाइस दीर्घकाळ थंड राहू शकते आणि परफॉर्मन्स अधिक स्थिर राहील.

नवीन डिस्प्ले आणि अधिक ब्राईटनेस

6.9-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले हा Pro Max चा मुख्य हायलाईट ठरणार आहे. यावर्षी सर्वच iPhone 17 मॉडेल्समध्ये 120Hz ProMotion रिफ्रेश रेट देण्यात येणार आहे, त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडिओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूद होईल. शिवाय, anti-reflective coating देखील देण्यात येणार असल्यामुळे, उन्हात फोन वापरणे अधिक सोपे होईल.

कॅमेरा फक्त हार्डवेअर नव्हे, तर सॉफ्टवेअरही दमदार

कॅमेराच्या सॉफ्टवेअर बाबतीतही ऍपल अनेक नव्या फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. लीकनुसार, 3.5x ऑप्टिकल झूम असतानाही, ऍपल एक नवीन 7x डिजिटल लॉसलेस झूम देऊ शकतो, जो सेन्सर-आधारित क्रॉपिंगद्वारे उत्कृष्ट पोर्ट्रेट आणि दूरवरचे फोटो काढू शकतो. फ्रंट कॅमेराही 24MP पर्यंत अपग्रेड केला जाणार असून, सेल्फी आणि फेसटाइम अनुभव अधिक स्पष्ट आणि नैसर्गिक होणार आहे.

बॅटरी आणि चार्जिंगमध्येही पावले पुढे

तांत्रिकदृष्ट्या, apple iphone 17 pro max मध्ये आधीच्या तुलनेत मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता असून, 35W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाईल. Android फोनच्या तुलनेत हे चार्जिंग अद्याप कमी वाटेल, पण आयफोनच्या इतिहासात ही एक मोठी उडी असेल.

IP69 रेटिंग आणि टिकाऊपणा


सर्व मॉडेल्सप्रमाणे, apple iphone 17 pro max मध्येही IP69 रेटिंग असेल, म्हणजेच पाणी आणि धुळीपासून सर्वोत्तम संरक्षण मिळणार आहे.

किंमत आणि उपलब्धता

भारतामध्ये या डिव्हाइसची किंमत अंदाजे ₹1,64,900 पासून सुरू होऊ शकते, तर टॉप व्हेरियंटची किंमत $2,300 (अमेरिकेत) पर्यंत जाऊ शकते, ही किंमत वाढलेल्या आयात शुल्क आणि जागतिक व्यापारातील तणावामुळे अधिक होण्याची शक्यता आहे.

apple iphone 17 pro max हे डिझाइन, परफॉर्मन्स, कॅमेरा आणि टिकाऊपणा या सर्व बाबतीत ऍपलच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. iPhone वापरणाऱ्यांसाठी हे मॉडेल “Pro” अनुभवाचं खऱ्या अर्थानं नवं व्याख्यान ठरू शकतं. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लाँच कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे, आणि पुढील काही आठवड्यांत आणखी लीक्स आणि अपडेट्स पाहायला मिळणार याची शक्यता आहे.

Written By

माझं नाव आहे गौरव चव्हाण मी youtube, facebook आणि instagram या social media platform वरती मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या देत असतो. त्याच बरोबरच instagram Reels मध्ये tech videos बनवतो.

More From Author

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *