amruta bane Shubhankar Ekbote pool romance video : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडप्यांमध्ये अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांची गणना केली जाते. सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारे हे दोघे पुन्हा एकदा एका खास व्हिडीओमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. अमृताने नुकताच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नवरा शुभांकरसोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमृता आणि शुभांकर हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो. यावेळी शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हे दोघे स्विमिंगपूलमध्ये निवांत वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
या व्हिडीओमध्ये अमृताचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. शुभांकरसोबत ती अतिशय आनंदी आणि रिलॅक्स मूडमध्ये दिसत असून दोघांमधील प्रेमळ बॉण्डिंग स्पष्टपणे जाणवत आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या जोडप्याचं कौतुक केलं असून तर काहींनी त्यांच्या केमिस्ट्रीला ‘क्युट’ आणि ‘परफेक्ट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता बनेने मराठी मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘रंग माझा वेगळा’, ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘कन्यादान’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली. दुसरीकडे शुभांकर तावडे हाही मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीचा चेहरा आहे. ‘धर्मवीर’, ‘चौक’, ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘मंत्र’ या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
विशेष म्हणजे ‘कन्यादान’ मालिकेदरम्यान अमृता आणि शुभांकर यांची जवळीक वाढली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आता लग्नानंतरही हे दोघे एकमेकांसोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असल्याने त्यांच्यावर चाहत्यांचे प्रेम अधिकच वाढताना दिसत आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग फेम अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेचा मुलीबाबत ‘गोड’ पश्चाताप; नवरा चिन्मयची भन्नाट समजूत
amruta bane Shubhankar Ekbote pool romance video
दरम्यान, अमृताने शेअर केलेला हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील हे गोड आणि लोकप्रिय कपल पुन्हा एकदा त्यांच्या खास अंदाजामुळे चर्चेत आले आहे.









