akshay kumar sky force OTT वर प्रदर्शित!

akshay kumar sky force OTT

akshay kumar sky force  हा चित्रपट आता OTT वर उपलब्ध आहे. हा देशभक्तीपर चित्रपट Amazon Prime Video वर  पाहता येईल. जाणून घ्या या चित्रपटाबद्दल संपूर्ण माहिती!

akshay kumar sky force : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘Sky Force’ अखेर OTT वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो Amazon Prime Video वर उपलब्ध आहे, परंतु प्रेक्षकांना तो पाहण्यासाठी ₹३४९ भाडे द्यावे लागेल.

‘akshay kumar sky force’ हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान झालेल्या पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. या युद्धात भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सर्गोधा एअरबेसवर मोठा हल्ला केला होता. चित्रपटाची कथा १९६५ ते १९८८ या कालावधीत घडते आणि त्यात भारतीय वायुदलाच्या पराक्रमाची झलक पाहायला मिळते.

अक्षय कुमार यांनी स्क्वाड्रन लीडर कुमार ओम अहुजा यांची भूमिका साकारली आहे, तर वीर पहारिया यांनी विंगमन टी.के. विजय (टॅबी) ही भूमिका केली आहे. चित्रपटात सारा अली खान, निम्रत कौर, शरद केळकर, मनीष चौधरी आणि वरुण बडोला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

akshay kumar sky force  चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे, परंतु तो नियमित सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट नाही. प्रेक्षकांना तो ₹३४९ मध्ये पाहाता येईल.

हे पण वाचा ..emraan hashmi awarapan पुन्हा रिलीज – चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

akshay kumar sky force हा चित्रपट भारतीय वायुदलाच्या पराक्रमावर आधारित असून त्यात एक रोमांचक कथा दाखवण्यात आली आहे.
१९६५ मध्ये पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असते.स्क्वाड्रन लीडर अहुजा यांना याची माहिती मिळते, पण सरकार शांततेसाठी हल्ला करण्यास नकार देते. त्यामुळं पाकिस्तानी एअरबेस सर्गोधावर हल्ला करण्याची जबाबदारी अहुजा यांच्यावर येते.त्यांचा सहकारी टॅबी एका मिशनदरम्यान बेपत्ता होतो आणि अहुजा त्याला शोधण्यासाठी धोका पत्करतात.या चित्रपटात शौर्य, बलिदान आणि भारतीय वायुदलाच्या अभिमानास्पद क्षणांचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे.

हा चित्रपट काही अरब देशांमध्ये (UAE, ओमान, सौदी अरेबिया, कतार) प्रदर्शित करण्यात आला नाही, कारण त्याच्या कथानकावर वाद निर्माण झाले होते.

थिएटरमध्ये हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला.प्रारंभीच्या दिवसांत चित्रपटाने चांगली कमाई केली, पण नंतर त्याच्या कमाईत घट झाली.एकूण अंदाजे ₹१४०-१६८ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे.

‘Sky Force’ चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ETimes ने चित्रपटाला 3.5/5 स्टार रेटिंग दिले आहे. समीक्षकांनी अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे.

Sky Force हा चित्रपट OTT वर पाहण्यास उपलब्ध केला आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीम करण्यात येणार असून. तो २१ मार्च २०२५ रोजी पूर्णतः प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. जर तुम्हाला हा चित्रपट पाहिचा असेल, तर त्यासाठी ₹३४९ खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर  तुम्हाला ३० दिवसांचा कालावधी मिळेल, मात्र एकदा चित्रपट सुरू केल्यावर तो ४८ तासांच्या आत पूर्ण करावा लागणार आहे.

हे पण वाचा ..shahid kapoor आणि नोरा फतेही जयपूरमध्ये IIFA 2025 साठी दाखल!उत्सुकता शिगेला!

अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांचा दमदार अभिनय या चित्रपटाची खासियत आहे. भारतीय वायुदलाच्या शौर्याचा प्रेरणादायी प्रवास यात पाहायला मिळतो. थरारक युद्ध दृश्ये आणि जबरदस्त देशभक्तीपर कथा या चित्रपटाला वेगळेपण देतात. तसेच, अद्वितीय ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच भावेल. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे.

‘Sky Force’ हा चित्रपट भारताच्या सैन्याच्या पराक्रमाचा गौरव करणारा चित्रपट आहे. तुम्हाला थरारक युद्धपट आणि देशभक्तीपर चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की पहा! तो Amazon Prime Video वर उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *