aishwarya narkar isha sanjay birthday post : मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा आज ५१ वा वाढदिवस. छोट्या पडद्यावर अनेक वर्षे प्रभावी भूमिका साकारत त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी आणि श्रीमंताघरची सून यांसारख्या मालिकांमधल्या त्यांच्या दमदार अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या. अभिनयासोबतच नियमित योगा, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीमुळेही ऐश्वर्या नारकर सतत चर्चेत असतात.
या खास दिवशी मराठी कलाविश्वातून चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सर्वाधिक चर्चेत आली ती अभिनेत्री ईशा संजय हिची पोस्ट. ईशा संजय गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या नारकरांचे पुत्र अमेय नारकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने सोशल मीडियावरून अनेकदा अमेयबद्दलची आपुलकी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी आस्क मी सेशनमध्ये Isha Sanjay ने त्यांचं नातं खुलेपणाने मान्यही केलं होतं.
आता ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ईशा संजय हिने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. “माझी सगळ्यात सुंदर मैत्रीण… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जशी आहेस तशीच रहा… आय लव्ह यू” अशा मनापासून लिहिलेल्या संदेशासह तिने दोघींचे सुंदर आणि जिव्हाळ्याचे क्षण टिपणारे फोटो पोस्ट केले. तिच्या या पोस्टला काही मिनिटांतच भरघोस प्रतिक्रिया मिळू लागल्या.
नेटकऱ्यांनीही या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “सून स्टार आणि सासू सुपरस्टार”, “कमाल बॉण्डिंग”, “तुमचं नातं खूपच सुंदर” अशा प्रतिक्रिया भरभरून उमटल्या. चाहत्यांनी दोघींच्या नात्यातील जवळीक आणि आस्थेचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, अमेय नारकर सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याने या काळात जोडीला थोडं अंतर आलं आहे. मात्र, नात्यातील जिव्हाळा कायम असल्याचं ईशा संजय वेळोवेळी दाखवत असते. काही महिन्यांपूर्वी अमेय भारतात परतल्यावर तिने एअरपोर्टवर जाऊन त्याचं स्वागत केलं होतं. त्या क्षणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
हे पण वाचा.. आमच्यासाठी तूच खरा विजेता!’ – अंकिता वालावलकरची प्रणित मोरेवर भावूक पोस्ट
ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईशा संजय कडून मिळालेल्या मनापासून शुभेच्छांनी हा दिवस अधिकच खास झाला असून सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट आज दिवसभर चर्चेत राहिली.
हे पण वाचा.. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोडले ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’चे अध्यक्षपद; भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा









