स्टार प्रवाह नुकतंच प्रदर्शित केलेल्या लपंडाव Lapandav Serial या नवीन मालिकेच्या प्रोमो मध्ये अभिनेत्री सायली संजीव न दिसल्यामुळे चाहते मालिकेवर नाराज झाले आहेत, त्याला जाणून घेऊयात सायली संजीव या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे का नाही?
लपंडाव मालिकेमध्ये सायली संजीव झळकणार या भूमिकेत Lapandav Serial
मंडळी स्टार प्रवाह वर नव्याने सुरू होणाऱ्या लपंडाव या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या चांगला चर्चेत आलाय, गेल्या वर्षभरापासून स्टार प्रवाह वर सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांची नवीन मालिका येणार अशी चर्चा सुरू होती, त्यानुसार स्टार प्रवाह नुकतच लपंडाव या नव्या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित केला याप्रमाणे आपल्याला रूपाली भोसले चेतन वडनेरे आणि कृतिका देव हे कलाकार पाहायला मिळाले..

परंतु या प्रोमो मध्ये अभिनेत्री सायली संजीव कुठेही न दिसल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या अनेकांनी ती या मालिकेमध्ये का नाही आहे ती या मालिकेत झळकणार आहे का नाही अशी असंख्य प्रश्न विचारात प्रोमो वरती नाराजी व्यक्त केली.. Lapandav Serial
अभिनेत्री सायली संजीव हिने देखील स्टार प्रवाहने इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या मालिकेच्या प्रोमो वर congratulations अशी कमेंट करत रूपाली चेतन आणि कृतीका या तिघांनाही टॅग केलं. यानंतर या कमेंटला रिप्लाय देत अभिनेत्री कृतिका देव हिने ताईसाहेब अशी कमेंट केली, तर अभिनेता चेतन वडनेरे यांनी देखील हार्ट इमोजीने रिप्लाय केला.
कृतिका ने सायलीला ” ताईसाहेब ” म्हटल्यामुळे आता नव्या चर्चांना उधान आलं आहे, या मालिकेमध्ये सायली संजीव ही कृतिकाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे, लवकरच आपल्याला या मालिकेचा दुसरा प्रभू पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला सायली संजीव ची झलक पाहायला मिळेल.
सायली या मालिकेत झळकणार असल्यामुळे तिचे चाहते मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत! Lapandav Serial