अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर फसवणुकीचे साधन म्हणूनही केला जातो. याच ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला आहे मराठीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते सागर कारंडे ( Sagar Karande ). एका बनावट सोशल मीडिया स्कीममुळे त्यांनी तब्बल ६१ लाखांपेक्षा अधिक रक्कम गमावली असून, हे प्रकरण समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Table of Contents
अशी झाली Sagar Karande ची फसवणूक
सागर कारंडे यांना फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. या मेसेजमध्ये “इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करा आणि प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळवा” असा मोहक प्रस्ताव देण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमावण्याची संधी वाटल्याने सागर यांनी या कामात रस दाखवला.
सुरुवातीला त्या व्यक्तीने त्यांना विश्वासात घेण्यासाठी काही पैसे पाठवले. या व्यवहारातून सागर यांना ११ हजार रुपये मिळाले आणि त्यामुळे हा व्यवहार खरा वाटू लागला. काही दिवसांनी त्या व्यक्तींनी अधिक पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करण्यास सुचवलं. यानंतर सागर ( Sagar Karande ) यांनी विश्वास ठेवून पहिल्यांदा २७ लाख रुपये गुंतवले.
त्यांना सांगण्यात आलं की, ही एक टास्क बेस्ड स्कीम आहे. काम पूर्ण झाल्यावर वॉलेटमध्ये असलेले पैसे काढता येतील. मात्र काही टप्प्यावर त्यांना सांगण्यात आलं की, ८०% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी पैसे भरणे गरजेचे आहेत. यावर विश्वास ठेवून सागर यांनी पुढे १९ लाख रुपये भरले. यावरच न थांबता त्यांच्याकडून ३० टक्के करही भरायला लावण्यात आला.
संपूर्ण व्यवहारात सागर कारंडे यांच्याकडून एकूण ६१.३० लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आली. पण एवढे पैसे भरूनही त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही. उलट, चुकीच्या खात्यात कर भरल्याचं सांगत त्यांच्याकडून अजून पैशांची मागणी होऊ लागली. यावर सागर यांना संशय आला आणि त्यांनी लगेचच सायबर क्राइम विभागाकडे धाव घेतली.
या प्रकरणी मुंबईच्या उत्तर विभागातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिघा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ( Sagar Karande cyber crime )
Tejashri Pradhan : होणार सुन मी ह्या घरची सावत्र आईसोबत तेजश्री प्रधानची भेट..
तुमच्यासोबत होऊ नये म्हणून घ्या खबरदारी
ही घटना फक्त सागर कारंडे यांच्यासाठीच नाही, तर सामान्य नागरिकांसाठीही मोठा धडा आहे. ऑनलाइन माध्यमातून मिळणाऱ्या “संधी” या नावाखाली कित्येकजण फसवले जात आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती किंवा लिंक येताच तपासणी करूनच त्यावर विश्वास ठेवावा, असा इशारा सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ( Sagar Karande )