ADVERTISEMENT

शेवटच्या क्षणी तिला बोलताही येत नव्हतं; प्रिया मराठेबद्दल अभिजीत खांडकेकरची भावनिक प्रतिक्रिया

अभिनेते अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar on Priya Marathe) यांनी दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. कर्करोगाशी शेवटपर्यंत झुंज देत असतानाही ती हसतमुख राहिली, काम करत राहिली, आणि शेवटच्या दिवसांपर्यंत ती खंबीर राहिली, असं अभिजीतने सांगितलं.
Abhijeet Khandkekar on Priya Marathe

Abhijeet Khandkekar on Priya Marathe मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानं संपूर्ण कलाविश्व हादरून गेलं आहे. कर्करोगाशी दोन हात करत अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी तिनं या जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर तिचे सहकलाकार आणि मित्र अजूनही त्या आठवणीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. नुकतंच अभिनेता अभिजीत खांडकेकर यानं तिच्याबद्दल व्यक्त केलेली भावना ऐकून प्रेक्षकही भावुक झाले आहेत.

‘लोकमत फिल्मी’शी बोलताना अभिजीतनं सांगितलं की, प्रियाला हा आजार जवळपास दीड वर्षांपासून झाला होता. तिच्या घरच्यांव्यतिरिक्त फार कमी लोकांना याची माहिती होती, आणि त्यापैकी तो एक होता. “आम्ही दररोज एकत्र काम करायचो, खूप जवळचे मित्र होतो. तिची तब्येत ढासळत चालली आहे हे माहीत असूनही मन मानायला तयार नव्हतं,” असं तो म्हणाला. Abhijeet Khandkekar on Priya Marathe

अभिजीत पुढे सांगतो, “आजही सकाळी फोन हातात घेतो तेव्हा गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवावासा वाटतो, आणि नकळत तिचं नाव टाईप होतं. कारण तिच्या निधनाच्या आदल्या दिवशीच आमचं बोलणं झालं होतं. ती त्या वेळी कोणालाही भेटायला तयार नव्हती, पण मी आग्रहानं तिला भेटायला गेलो. मी म्हटलं – तू काही बोलू नकोस, मला फक्त तुला बघायचं आहे.”

अभिजीतच्या मते, प्रिया शेवटपर्यंत खंबीर राहिली. उपचार सुरू असतानाही तिनं नाटकं आणि मालिकांमध्ये काम केलं. सेटवर लोकांना ती का वारंवार सुट्टी घेतेय याची शंका यायची, पण फार थोड्यांनाच तिच्या आजाराबद्दल माहिती होती. “त्या काळात तिला दोन वाक्य बोलणंसुद्धा कठीण झालं होतं, तरी ती प्रयत्न करत होती,” असं तो सांगतो.

दिवाळीतच आजारपणाचा फटका! जुई गडकरी टायफॉईडने त्रस्त; चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

प्रियाबरोबरच्या आठवणींबद्दल बोलताना अभिजीत म्हणतो Abhijeet Khandkekar on Priya Marathe, “ ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेदरम्यान आम्ही खूप जवळ आलो. एकत्र वेळ घालवणं, गप्पा मारणं, हसणं—हे सगळं आजही डोळ्यासमोर आहे. पण देवाच्या मनात जे असतं ते होतंच, हे स्वीकारणं कठीण आहे.” आज प्रिया मराठे आपल्यात नसली तरी तिचं हसतमुख व्यक्तिमत्त्व, तिची जिद्द आणि कामावरील निष्ठा हे सगळं कायम स्मरणात राहणार आहे. अभिजीत खांडकेकरनं तिच्या आठवणी सांगताना व्यक्त केलेली ही भावनिक प्रतिक्रिया चाहत्यांच्या मनाला भिडणारी ठरली आहे.