Shiva Serial End: ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘शिवा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली असून, या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही बातमी एक धक्का आहे. जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ही मालिका ८ ऑगस्ट २०२५ रोजी शेवटचा भाग प्रसारित करून थांबणार आहे.
‘शिवा’ ही मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाली होती. यात मुख्य भूमिकांमध्ये शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या जोडीने आपल्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. मालिका ४९१ भागांनंतर संपणार असल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या मालिकेचा शेवट जवळ आल्यामुळे कलाकारही भावनिक झाले आहेत. अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर शेवटच्या शूटिंगच्या दिवशीचा एक खास व्हिडिओ आणि फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. “One Last Time… प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवणार आहे,” असं कॅप्शन तिने दिलं. फोटोमध्ये ती मालिकेतील लूकप्रमाणे शर्ट आणि जीन्समध्ये सज्ज दिसतेय, तर व्हिडिओमध्ये सेटवरील गोड आठवणी टिपताना दिसते. Shiva Serial End
‘शिवा’ मालिकेच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे यातील वास्तवदर्शी कथा, भावनिक नात्यांचा गुंता आणि ठसठशीत संवाद. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेशी भावनिक नातं जोडलं होतं. त्यामुळेच या मालिकेच्या शेवटाने चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे.
दोन नव्या मालिका येणार असल्यामुळे ‘शिवा’ मालिकेला वेळेपूर्वी समाप्तीचा निर्णय घ्यावा लागल्याचं समजतं. ११ ऑगस्टपासून अभिनेत्री शिवानी सोनारची ‘तारिणी’ ही नवीन मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे.
Prathamesh Parab चा मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवास; टीसीकडून मिळाली अनोखी शिक्षा!
‘शिवा’ Shiva Serial End मालिका संपत असली तरी तिची आठवण प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार, हे निश्चित. कलाकारांनीही ही मालिका त्यांच्या करिअरमधील एक अविस्मरणीय टप्पा असल्याचं म्हटलं आहे.









