ADVERTISEMENT

शिवानी सोनारने खरेदी केली नवी झगमगती टाटा Altroz गाडी, Shivani Sonar new car

मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या कुटुंबासह टाटा Altroz ही नवकोरी कार खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारसोबतच्या फोटोंनी सोशल मीडियावर उत्साह निर्माण केला आहे. Shivani Sonar new car
Shivani Sonar new car

Shivani Sonar new car मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या कुटुंबासह टाटा Altroz ही नवकोरी कार खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारसोबतच्या फोटोंनी सोशल मीडियावर उत्साह निर्माण केला आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या वैयक्तिक आयुष्यात नुकताच एक खास क्षण उजळून निघाला आहे. तीने नुकतीच टाटा कंपनीची टाटा Altroz ही झगमगती नवी कार खरेदी केली आहे. या गाडीबाबतचा अनुभव आणि भावना तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या पोस्टवर चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

शिवानीने कारसोबतचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत “My OG ‘TARINI’ is here” असं कॅप्शन दिलं आहे. या खास प्रसंगाला तिचे कुटुंबीयही उपस्थित होते. एकत्रितपणे कार शोरूममध्ये जाऊन ही खास गाडी खरेदी करताना शिवानी आणि तिच्या कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कौतुकाची थाप देत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Shivani Sonar new car

शिवानी सोनारने खरेदी केलेली Tata Altroz ही कार बाजारात तिच्या डिझाईन, सेफ्टी फीचर्स आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. सध्या या गाडीची किंमत सुमारे ६ लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती १० लाखांपर्यंत पोहोचते. शिवानीने घेतलेली गाडी Altroz चं नवीन मॉडेल असल्याचं बोललं जातं आहे. Shivani Sonar new car

‘ठरलं तर मग’ फेम Amit Bhanushali अभिनयासोबत कॉर्पोरेट विश्वातही यशस्वी, एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये करत आहे काम!

शिवानी सोनारने आपल्या अभिनय कारकिर्दीत ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. यानंतर ‘सिंधुताई माझी माय’, ‘तू भेटशी नव्याने’ अशा लोकप्रिय मालिकांमधून तिची उपस्थिती अधोरेखित झाली. सध्या ती झी मराठीवरील ‘तारिणी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून या भूमिकेसाठी ती सज्ज झाल्याचं देखील तिच्या सोशल मीडियावरून स्पष्ट होतं.

शिवानी सोनारचा हा टाटा Altroz कार खरेदी करण्याचा क्षण फक्त तिच्यासाठीच नाही, तर तिच्या चाहत्यांसाठी देखील एक आनंदाचा क्षण ठरला आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील अशा खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणं ही आजची ट्रेंडिंग बाब आहे. शिवानीसारखी अभिनेत्री ज्या आत्मीयतेने आणि सच्च्या भावनेने हे क्षण शेअर करते, त्यामुळे ती चाहत्यांच्या हृदयात अधिक जवळची वाटते. Shivani Sonar new car