ADVERTISEMENT

अभिनेत्री प्राची पिसाटला अभिनेत्याचा आक्षेपार्ह मेसेज; सोशल मीडियावर संतापाचा भडका Prachi Pisat Sudesh Mhashilkar

झी मराठीवरील 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्री प्राची पिसाटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मराठी अभिनेत्याने तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला असून, प्राचीनं त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. Prachi Pisat Sudesh Mhashilkar
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Massages

Prachi Pisat Sudesh Mhashilkar Massage: झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्री प्राची पिसाटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मराठी अभिनेत्याने तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला असून, प्राचीनं त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये ‘तारा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची ( Prachi Pisat ) पिसाट सध्या एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. मराठी टेलिव्हिजनमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याने तिला फेसबुक व इन्स्टाग्रामवर अश्लील आणि खाजगी मेसेज करून त्रास दिला. या प्रकाराविरोधात प्राचीनं आवाज उठवत त्या अभिनेत्याचा मेसेज सोशल मीडियावर शेअर केला असून, यामुळे प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.

प्राची पिसाट हिने फेसबुकवरून एक स्क्रीनशॉट शेअर केला असून, त्यामध्ये अभिनेता सुदेश म्हशीलकर यांचं नाव स्पष्टपणे दिसतं. त्या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे, “तुझा नंबर पाठव, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, कसली गोड दिसतेयस.” हा मेसेज पाहून प्राचीनं तीव्र प्रतिक्रिया देत लिहिलं, “आणि मला हा स्क्रीनशॉट शेअर करायची इच्छा झाली आहे. तुझ्याकडे बायकोचा नंबर असणारच. तीही गोडच असेल, बघ तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का.”

सुदेश म्हशीलकर Sudesh Mhashilkar हे गेली अनेक वर्षं मराठी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ‘भाग्य दिले तू मला’, ‘श्रीमंत घरची सून’, ‘अवघाचं संसार’, तसेच ‘रानबाजार’ या वेब सिरीजमध्ये देखील काम केलं आहे. मात्र, त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे.

प्राचीने केवळ फेसबुकवरूनच नाही, तर इन्स्टाग्रामवर आलेल्या अशाच स्वरुपाच्या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. दुसऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, “खूपच सेक्सी दिसायला लागली आहेस हल्ली… वाह!” या प्रकारांमुळे ती नाराज झाली असून, याविरोधात तिने खुलेआम पोस्ट लिहिली आहे.

ताराचं लग्न थांबवण्यासाठी सावलीनं घेतलं जोगतिणीचं रूप Savalyachi Janu Savali

तिने पुढे लिहिलं, “मला धमकावून, प्रेशर टाकून ही पोस्ट डिलीट करायला सांगण्यात आलं. त्यामुळेच आता मला वाटतंय की ही पोस्ट माझ्या फीडवर कायम राहिली पाहिजे. जोपर्यंत सुदेश म्हशीलकर सोशल मीडियावर गोड शब्दांत माफी मागत नाहीत, तोपर्यंत ही पोस्ट काढणार नाही.”

या प्रकरणावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा अकाउंट हॅक झाला असण्याची शक्यता वर्तवली. मात्र, प्राचीनं त्यावरही उत्तर दिलं की “हा मेसेज त्याच अकाऊंटवरून आला असून, हॅकिंगचा प्रश्नच येत नाही. अनेक मुलींना असे मेसेज त्याच्याकडून मिळाले असल्याचंही मला समजलं आहे.”

तिच्या या पोस्टवरून अनेक महिला कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मराठी मनोरंजन विश्वात सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे. प्राचीने आपल्या मतांमधून स्पष्टपणे दाखवून दिलंय की कोणत्याही स्त्रीला अशा प्रकारे त्रास देणं अजिबात सहन केलं जाणार नाही.

सध्या सुदेश म्हशीलकर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ Kon Hotis Tu Kay Zalis Tu या मालिकेत झळकत आहेत. मात्र, या वादावर त्यांनी अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. प्राची पिसाटने दिलेली ही धडक प्रतिक्रिया अनेकांसाठी जागरूकता निर्माण करणारी ठरली असून, सोशल मीडियावर गैरवर्तन करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा मिळावी, अशीच भावना व्यक्त होत आहे.