Kon Hotis Tu Kay Zalis Tu : कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या टीमचे कोकणात जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ शहरात नुकतेच ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ( Kon Hotis Tu Kay Zalis Tu ) या नव्या मालिकेच्या कलाकारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या शुटिंगसाठी कलाकारांची टीम कोकणात दाखल झाली असून, त्यांच्या आगमनाने कुडाळमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Kon Hotis Tu Kay Zalis Tu चित्रीकरणासाठी कलाकार पोहोचले कोकणात

चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी कोकणचा नैसर्गिक सौंदर्य लाभलेला प्रदेश सध्या लोकप्रिय ठिकाण बनत आहे. या पार्श्वभूमीवर Kon Hotis Tu Kay Zalis Tu ही नवीन मालिका देखील कोकणातील कुडाळ येथे चित्रित केली जाणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांनी कलाकारांसोबत कुडाळ गाठलं असून, लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे.

कलाकारांचे कुडाळ रेल्वे स्थानकात आगमन होताच, स्थानिक महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नऊवारी नेसलेल्या सवाष्ण महिलांनी औक्षण करत, कोकणातील खास पाहुणचार – कोकम सरबत – देऊन कलाकारांना कोकणी प्रेमाचा अनुभव दिला. या खास स्वागताने सर्व कलाकार भारावून गेले होते. कोकणातील आतिथ्यशीलतेचा प्रत्यय देणारा हा प्रसंग सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.

Kon Hotis Tu Kay Zalis Tu या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे मंदार जाधव, गिरीजा प्रभू, सुकन्या मोने कुलकर्णी, वैभव मांगले, अमित खेडेकर आणि अमृता माळवदकर हे कलाकार या प्रसंगी उपस्थित होते. कलाकारांना इतकं आत्मीयतेने सामोरं घेतल्यामुळे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कोकणवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.

ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं की, “कुडाळमध्ये आम्हा सर्वांचं ज्या प्रकारे औक्षण करून स्वागत झालं, ते अनुभवणं हे एक अनोखं क्षण होतं. पहिल्यांदाच मी या भागात आले असून, येथील शांतता आणि सकारात्मक वातावरण मनाला भिडणारं आहे.”

मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरीजा प्रभू हिनं देखील आपला आनंद व्यक्त करत म्हटलं, “कोकण म्हटलं की आपुलकी आणि प्रेम आठवतं, आणि इथे पोहोचताच ते प्रत्यक्ष अनुभवता आलं. प्रेक्षकांचं प्रेमही अशाच प्रकारे मिळावं हीच इच्छा आहे.”

प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या भूमिकांमधून लोकप्रिय झालेली जोडी – गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव – पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. नवीन मालिकेत ते यश आणि कावेरी या व्यक्तिरेखा साकारणार असून, त्यांच्या पुनर्मिलनामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Paaru : झी मराठीवर ‘पारू’ नंबर १, ‘शिवा’ मालिकेचीही जबरदस्त कामगिरी! TRP यादी जाहीर

कलाकारांच्या स्वागताचे फोटो व्हिडिओ व्हायरल

Kon Hotis Tu Kay Zalis Tu या मालिकेच्या कोकणातील चित्रीकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कोकणवासीयांनी दिलेल्या मनापासून स्वागताने कलाकारांच्या मनात कोकणाबद्दल विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये कोकणची निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि स्थानिक सौंदर्य अधिक खुलवण्यात येईल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.

Written By

माझं नाव आहे गौरव चव्हाण मी youtube, facebook आणि instagram या social media platform वरती मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या देत असतो. त्याच बरोबरच instagram Reels मध्ये tech videos बनवतो.

More From Author

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *