loveyapa movie आता OTT वर! जुनेद खान आणि खुशी कपूरच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद. रोमँटिक केमिस्ट्रीची जादू अनुभवायला विसरू नका!
Table of Contents
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील कलाकार जुनेद खान आणि खुशी कपूर यांचा चित्रपट ‘loveyapa movie’ आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने विशेष कमाई केली नाही, मात्र कथा आणि सादरीकरणामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आता तो JioHotstar वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे.
थोडक्यात काय आहे ‘loveyapa movie’ची कथा?
एक रोमँटिक कॉमेडी आहे, जी नव्या पिढीतील प्रेमाची गंमतशीर बाजू मांडते. प्रेमात आकंठ बुडालेल्या एका कपलला त्यांच्या नात्यातील खरीखुरी परीक्षा द्यावी लागते. लग्नाच्या काही दिवस आधी दोघांना एक दिवसासाठी एकमेकांचे फोन एक्सचेंज करायला लागतात आणि यामुळे अनेक अनपेक्षित सत्य समोर येतात. गुपितं उघड झाल्यावर त्यांचे नाते टिकते का? त्यांचा विश्वास ढासळतो का? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
loveyapa movie ही कथा तामिळ चित्रपट ‘Love Today’ वर आधारित आहे. मूळ चित्रपटाच्या यशानंतर हिंदी प्रेक्षकांसाठी याचा रिमेक करण्यात आला असून, त्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. याआधी अद्वैत यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ सारखा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाची निर्मिती आणि कलाकार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत मडू मंटेना आणि फँटम स्टुडिओजचाही सहभाग आहे.
जुनेद खान आणि खुशी कपूर हे या चित्रपटाचे मुख्य चेहरे आहेत. विशेष म्हणजे, आमिर खानचा मुलगा जुनेद आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची कन्या खुशी दोघेही हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील दुसरा चित्रपट आहे. जुनेदने याआधी ‘महाराज’ या नेटफ्लिक्स चित्रपटात काम केले होते, तर खुशी कपूरने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या जोडीला आशीष राणा, गृषा कपूर, तनविका पारलिकर आणि किकू शारदा यांसारखे अनुभवी कलाकार या चित्रपटात झळकतात.
हे पण वाचा..test movie चा नेटफ्लिक्सवरील प्रवास: क्रिकेटच्या मैदानातील संघर्षाची कहाणी
प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद
थिएटरमध्ये या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळाली नाही. व्हॅलेंटाइन डे च्या आसपास प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाला रोमान्सप्रेमी प्रेक्षक मिळाले, पण तरीही बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षेप्रमाणे चालला नाही. मात्र, ज्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला, त्यांना तो चांगलाच भावला. विशेषतः, चित्रपटाचा फ्रेश आणि आधुनिक टच असलेला प्लॉट, हलकीफुलकी पटकथा, तसेच युवा कलाकारांचे सहजसुंदर अभिनय यामुळे अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं.
दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं की, “प्रत्येक जोडप्याच्या नात्यात काही न काही गुपितं असतात. जर ते अचानक समोर आले, तर नात्याचं काय होईल, यावर हा चित्रपट भाष्य करतो. यामुळे प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशीही याची सांगड घालता येते.”
loveyapa movie ओटीटीवर पाहण्याची संधी
चित्रपट थिएटरमध्ये पाहता न आलेल्यांसाठी आता ही एक उत्तम संधी आहे. ‘loveyapa movie’ हा ४ एप्रिलपासून JioHotstar वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. खुशी कपूरने तिच्या सोशल मीडियावरून याची घोषणा करत चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचं निमंत्रण दिलं आहे.
trailer इथे पहा..
बॉलिवूडमध्ये नवी पिढी आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. जुनेद खान आणि खुशी कपूर यांची ही नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.