yuzvendra chahal च्या होळी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. ‘आमचीही प्रायव्हसी आहे’ यावक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. काहींना वाटतंय, ही टिप्पणी धनश्रीवर अप्रत्यक्ष टोला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल ( yuzvendra chahal ) याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा क्रिकेट मैदानाबाहेरही थांबत नाही. त्याची आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील नातं संपुष्टात आलं असलं, तरी सोशल मीडियावर या दोघांबाबत चर्चा कायम आहे.
नुकताच चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला एक व्हिडिओ यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेकांना वाटतंय की, हा व्हिडिओ धनश्रीला अप्रत्यक्षरित्या जळवण्यासाठीच पोस्ट करण्यात आला आहे का?
yuzvendra chahal ने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक हलकाफुलका व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो गाडीतून उतरत आपल्या खोलीकडे जात असतानाच काही चाहते अचानक त्याच्यासमोर येऊन होळी खेळण्याचा आग्रह करतात. चहल त्यांना मिश्कीलपणे विचारतो, “तुम्हाला आम्ही येण्याआधीच कसं कळतं?” आणि लगेचच त्याचं पुढचं वाक्य प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं – “नाही कळायला पाहिजे… आमचीही प्रायव्हसी आहे!” या वाक्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या अर्थाने त्याचा विचार सुरू केला आहे.
चहलने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “झी भाईसोबत नेहमी आनंद, कधी दुःख नाही… सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा!” विशेष म्हणजे, त्याने आपल्या आगामी संघ पंजाब किंग्सला या पोस्टमध्ये टॅग देखील केलं आहे. आगामी IPL 2025 मध्ये चहल पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. या फ्रँचायझीनं चहलवर 18 कोटींचा बोली लावून त्याला संघात घेतलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या कामगिरीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
मात्र, या व्हिडिओमुळे चहलच्या वैयक्तिक आयुष्याचीही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काहींना असं वाटतं की, चहल जाणीवपूर्वक अशा पोस्ट शेअर करत आहे, ज्यामुळे त्याच्या माजी पत्नी धनश्रीला अप्रत्यक्षरित्या टोला लागेल. काही दिवसांपूर्वीच चहलचं नाव प्रसिद्ध आरजे महविशसोबत जोडलं गेलं होतं. दोघांना एकत्रितपणे क्रिकेट मॅच पाहताना पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या संबंधांबाबत चर्चा रंगल्या. त्याचवेळी धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चहलसोबतचे जुने फोटो पुन्हा शेअर केले होते. या प्रकारामुळे अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की, “धनश्रीला चहल आणि महविशचं नातं पाहून जळतंय का?”
हे पण वाचा..dhanashree ने चहलसोबतचे फोटो पुन्हा शेअर केले; RJ Mahvash सोबतच्या चर्चांदरम्यान पोस्ट
yuzvendra chahal आणि धनश्री वर्मा यांचं लग्न २०२० मध्ये धूमधडाक्यात पार पडलं होतं. त्यावेळी ही जोडी क्रिकेट आणि डान्सच्या दुनियेत एक हॉट कपल म्हणून ओळखली जायची. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणावाचं वातावरण होतं. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतरही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची चर्चा थांबलेली नाही. त्यांच्या चाहत्यांमध्ये अजूनही या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
चहलच्या या नव्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत. काहींनी चहलला आपला आयुष्य पुढे नेत असल्याबद्दल समर्थन दिलं आहे, तर काहींनी त्याच्या अशा पोस्टला धनश्रीला दुखावण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. अनेक यूझर्सनी “प्रायव्हसी” या शब्दावरून अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. चहलने नेमकं हे कोणाला उद्देशून म्हटलं, यावर मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया त्याच्याकडून आलेली नाही.
दरम्यान, युजवेंद्र चहल IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार असल्याने त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. पंजाब किंग्सने त्याला विक्रमी 18 कोटींना खरेदी केलं आहे. अशातच त्याने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत, एक नवा संदेश दिला आहे की, तो आता वैयक्तिक आयुष्याच्या वादात अडकण्याऐवजी आपल्या प्रोफेशनल करिअरकडे अधिक लक्ष केंद्रित करतोय.
सध्या तरी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेमकं काय सुरू आहे हे स्पष्ट नाही. पण त्यांच्या पोस्ट्स आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र कुतूहल कायम आहे. त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या आयुष्यात स्थिरता यावी आणि ते आपापल्या मार्गावर यशस्वी व्हावेत अशीच अपेक्षा आहे.
हे पण वाचा..Ankit Gupta Priyanka Chahar Choudhary Breakup? चर्चांमुळे चाहत्यांमध्ये निराशा!