2025 Renault Kiger आणि Triber भारतात लॉन्च, पहा किंमत आणि फीचर्स!

2025 Renault Kiger Renault Triber

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात बजेट आणि प्रीमियम श्रेणीतील गाड्यांसाठी Renault हा एक महत्त्वाचा ब्रँड मानला जातो. कंपनी आपल्या SUV आणि MPV मॉडेल्समध्ये सातत्याने सुधारणा करत असते, आणि यावेळी Renault ने 2025 साठी अपडेटेड Kiger आणि Triber लॉन्च केल्या आहेत. या गाड्यांमध्ये काय बदल झाले आहेत, कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत आणि त्यांची किंमत किती आहे, हे सर्व मी तुम्हाला या लेखात सांगणार आहे.

Renault Kiger आणि Triber मध्ये काय नवीन?

Renault ने 2025 साठी आपली कॉम्पॅक्ट SUV Kiger आणि किफायतशीर MPV Triber यांचे अपडेटेड वर्जन मार्केटमध्ये आणले आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये नवीन फीचर्स आणि सुधारित टेक्नोलॉजी वापरण्यात आलीये. फेब्रुवारी 2025 मध्ये या गाड्या अधिकृतपणे लॉन्च झाल्या असून, खास करून भारतीय ग्राहकांसाठी त्या अधिकच आकर्षक आणि फिचर-लोडेड बनवण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.


Renault Kiger ही सब-4 मीटर SUV आहे जी विशेषतः शहरातील आणि लांब पल्ल्याच्या ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. दुसरीकडे, Renault Triber ही सर्वात स्वस्त 7-सीटर MPV आहे, जी मोठ्या कुटुंबांसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. सध्या बाजारामध्ये आणखी प्रगत आणि किफायतशीर पर्याय म्हणून या दोन्ही गाड्या उपलब्ध आहेत.

2025 Renault Kiger नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स काय आहेत?

Renault ने 2025 Kiger आणि Triber मध्ये काही अत्याधुनिक फीचर्स स्टँडर्ड म्हणून दिले आहेत. यात चारही पॉवर विंडोज, रिमोट सेंट्रल लॉक या काही खास गोष्टी आहेत. तसेच, RXL व्हेरिएंटपासून पुढे आठ इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, Android auto आणि Apple carplay सपोर्ट, रिअर व्ह्यू कॅमेरा आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल हे काही खास फीचर आहेत.

RXZ व्हेरिएंटमध्ये:


स्मार्ट कार्ड एक्सेस

रिमोट इंजिन स्टार्ट

RXT व्हेरिएंटमध्ये:

15 इंचांचे फ्लेक्स व्हील्स

इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय

Renault ने Kiger साठी RXT (O) व्हेरिएंटमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन आणि CVT ट्रान्समिशन पर्याय दिला आहे. यामुळे ग्राहकांना अधिक चांगली ड्रायव्हिंग परफॉर्मन्स मिळणार आहे. विशेष म्हणजे, Renault च्या तीनही गाड्या आता E-20 इंधनासोबत सुसंगत बनवण्यात आल्या आहेत, म्हणजेच त्या 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर देखील चालू शकणार आहेत.

2025 Renault Kiger किंमत किती आहे?

Renault Kiger आणि Triber या गाड्या आता अधिक किफायतशीर किमतीत बाजारात उपलब्ध आहेत.

Renault Kiger:

बेस व्हेरिएंट (RXE) – ₹6.10 लाख (एक्स-शोरूम)

टॉप व्हेरिएंट (RXZ) – ₹10.99 लाख (एक्स-शोरूम)



Renault Triber:

बेस व्हेरिएंट (RXE) – ₹6.10 लाख (एक्स-शोरूम)

टॉप व्हेरिएंट (RXZ) – ₹8.74 लाख (एक्स-शोरूम)

हे पण वाचा.. Kia EV4: सेडान आणि हॅचबॅकमध्ये उपलब्ध असलेली दमदार इलेक्ट्रिक कार!

2025 Renault Kiger स्पर्धा कोणाशी आहे?

Renault Kiger ही सब-4 मीटर SUV असल्यामुळे ती भारतीय मार्केटमध्ये आधीपासूनच असलेल्या अनेक लोकप्रिय SUV गाड्यांशी स्पर्धा करते. यामध्ये Nissan Magnite, Tata Punch, Maruti Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Kia Syros आणि Mahindra XUV 3XO यांसारख्या गाड्या समाविष्ट आहेत.

तर, Renault Triber ही देशातील सर्वात परवडणारी 7-सीटर MPV आहे. त्यामुळे ती थेट Maruti Ertiga आणि Kia Carens यांसारख्या मोठ्या गाड्यांशी स्पर्धा करताना पाहायला मिळेल.

नवीन Renault Kiger आणि Triber का घ्याव्यात?

जर तुम्ही एक किफायतशीर आणि फीचर-लोडेड SUV शोधत असाल, तर Renault Kiger हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला कमी बजेटमध्ये 7-सीटर कार घ्यायची असेल, तर Renault Triber तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. या दोन्ही गाड्या उत्तम मायलेज, उत्कृष्ट फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह येतात, त्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी त्या एक उत्तम निवड ठरू शकतात.


Renault ने 2025 साठी Kiger आणि Triber मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जे भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक असतील. सुधारित फीचर्स, नवीन ट्रान्समिशन पर्याय आणि किफायतशीर किंमत यामुळे या गाड्या त्यांच्या सेगमेंटमध्ये अजून अधिक स्पर्धात्मक बनल्या आहेत. जर तुम्ही नवीन SUV किंवा MPV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या गाड्यांचा जरूर विचार करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *