ADVERTISEMENT

कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi : 'कमळी' मालिकेत अनिकाच्या अंगावर शेण आणि चिखल उडाल्याचा सीन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ऑफस्क्रीन हा सीन अभिनेत्री केतकी कुलकर्णीने मजेशीर पद्धतीने शूट केल्याचं BTS व्हिडीओमधून समोर आलं आहे. 'कमळी' मालिकेतील या खास क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi : ‘कमळी’ मालिकेच्या कथानकाने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. मालिकेत घडणाऱ्या भावनिक आणि नाट्यमय घडामोडींमुळे प्रत्येक भाग चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच अलीकडे प्रसारित झालेल्या एका प्रसंगाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मालिकेतील अनिकाच्या अंगावर शेण आणि चिखल उडाल्याचा प्रसंग जितका पडद्यावर रंजक वाटला, तितकाच त्यामागचा ऑफस्क्रीन अनुभवही आता समोर आला आहे.

सध्या मालिकेच्या कथेनुसार कमळी आणि हृषी हे दोघेही कोल्हापूरमध्ये आहेत. अंतिम परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कमळी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेते. मात्र गावात पोहोचल्यावर तिच्यासमोर एक धक्कादायक सत्य उभं राहतं. तिचे लाडके आबा आता या जगात नाहीत, हे तिला तेव्हाच समजतं. वर्षभरापूर्वी झालेल्या त्यांच्या निधनाची माहिती तिच्यापासून लपवण्यात आली होती. ही बाब समजताच कमळी पूर्णपणे कोलमडून जाते आणि पुन्हा मुंबईला न जाण्याचा निर्णय घेते.

कमळीच्या आयुष्यातील या मोठ्या वळणामुळे हृषीलाही धक्का बसतो. तिची समजूत काढण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी तो थेट तिच्या गावात येतो. गावात राहताना त्याला अनेक नवीन गोष्टी समजतात. याच काळात घरात वेगळ्या ओळखीने राहणाऱ्या साधना मावशीच कमळीची खरी आई असल्याचं सत्यही त्याच्यासमोर उलगडतं.

दरम्यान, कमळी आणि हृषी यांच्यातील जवळीक वाढू नये यासाठी अनिका मैदानात उतरते. हृषीला पुन्हा मुंबईला परत बोलावण्यासाठी ती विविध डावपेच आखताना दिसते. याच पार्श्वभूमीवर तिची गावातील एन्ट्री दाखवण्यात आली आहे. गावात पोहोचताच तिच्यासोबत काही अनपेक्षित घटना घडतात. तिच्या महागड्या गाडीला अडचणी निर्माण होतात आणि त्यानंतर तिच्या अंगावर शेण व चिखल उडतो. या प्रसंगामुळे अनिका प्रचंड संतापलेली दाखवण्यात आली आहे.

मात्र पडद्यामागचं वास्तव काहीसं वेगळंच होतं. अनिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री केतकी कुलकर्णीने या दृश्याचा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण शूटिंग अत्यंत आनंदी वातावरणात पार पडल्याचं दिसून येतं. अनिकाच्या कपड्यांवर आणि शरीरावर शेण उडाल्याचा भास निर्माण करण्यासाठी विशेष कॉस्ट्यूम आणि मेकअपचा वापर करण्यात आला होता.

हे पण वाचा.. मीच खरी तन्वी आहे का?” मधुभाऊंच्या एका इशाऱ्याने उलगडलं मोठं रहस्य; ‘ठरलं तर मग’मध्ये अखेर सत्य समोर

kamali anika Shen chikhal bts video ketaki kulkarni zee marathi

हृषी बाईकवरून वेगाने जात असताना खड्ड्यातील चिखल आणि शेण अनिकावर उडतं, असा हा प्रसंग आहे. हा सीन वास्तवदर्शी दिसावा यासाठी अनेक तांत्रिक बाबींची काळजी घेण्यात आली. व्हिडीओमध्ये हृषीच्या एन्ट्रीसाठी एकापेक्षा अधिक टेक घेतल्याचंही पाहायला मिळतं. शूटिंगदरम्यान कलाकारांनी केलेली मजामस्ती आणि सेटवरील सकारात्मक वातावरण चाहत्यांना विशेष आवडलं आहे.

हे पण वाचा.. ती माझी बायको आहे… म्हणत समरने घेतली स्वानंदीची बाजू; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट

केतकी कुलकर्णीने शेअर केलेल्या या BTS व्हिडीओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या अभिनयासह या सीनच्या सादरीकरणाचं कौतुक केलं आहे. पडद्यावर रागावलेली आणि चिडलेली दिसणारी अनिका ऑफस्क्रीन मात्र सगळा अनुभव मनमुराद एन्जॉय करत असल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होतं. त्यामुळे ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागांविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.