veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. मालिकेच्या कथानकात आता असा मोठा ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे राजवाडे कुटुंबात एकच खळबळ उडणार आहे. अंशुमनच्या आयुष्यातील मोठं रहस्य उघड होणार असून त्यानंतर स्वानंदीचा संताप अनावर झालेला पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
राजवाडे कुटुंबात अंशुमनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते. घरातील सगळे जण लग्नसोहळ्याच्या तयारीत व्यस्त असताना मल्लिकाने आपल्या मुलासाठी श्रीमंत आणि प्रतिष्ठित मुलगी निवडलेली असते. मात्र, या सगळ्या आनंदाच्या वातावरणात एक धक्कादायक सत्य लपलेलं असतं. चिंगी अंशुमनच्या बाळाची आई होणार असल्याचं वास्तव स्वानंदीसमोर येतं आणि त्यानंतर संपूर्ण कथानकाला वेगळंच वळण मिळतं.
स्वानंदीला सुरुवातीला चिंगीच्या वागण्यातून काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होते. त्यानंतर तिला चिंगीचे मेडिकल रिपोर्ट्स मिळतात आणि त्यातून चिंगी गरोदर असल्याचं स्पष्ट होतं. हे बाळ अंशुमनचं असल्याचं समजताच स्वानंदीला जबर धक्का बसतो. एका बाजूला अंशुमनचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरत असताना दुसरीकडे चिंगी आयुष्यातील मोठ्या संकटाला सामोरी जात असल्याने स्वानंदी भावावर संतापते.
यानंतर मालिकेत अत्यंत भावनिक आणि तितकाच रंजक प्रसंग पाहायला मिळणार आहे. रडणाऱ्या चिंगीचा हात धरून स्वानंदी थेट लग्नमंडपात पोहोचते आणि अंशुमनचा लग्नसोहळा थांबवते. एवढंच नाही तर ती राजवाडे कुटुंबासमोर अंशुमनचं सत्य उघड करते. चिंगी गरोदर असल्याचं कळताच घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. स्वानंदीचा राग इतका वाढतो की ती अंशुमनला सणसणीत कानशिलात लगावते.
या सगळ्या प्रकारानंतर समरदेखील संतापलेला दिसणार आहे. तो अंशुमनला स्पष्ट शब्दांत अंतिम इशारा देतो. जर त्याने सत्य मान्य केलं तरच त्याच्याशी माणुसकीने वागेल, अन्यथा DNA टेस्टमध्ये सत्य समोर आल्यानंतर त्याच्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील, असं समर सांगतो. त्यामुळे आता अंशुमन नेमका कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.
हे पण वाचा.. कमळीचा मोठा विजय! 96.40% गुणांसह मुंबई विद्यापीठात प्रथम, अनिकाला बसला जबरदस्त धक्का
veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test
दरम्यान, मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत पुढे DNA टेस्टचा मोठा ट्रॅक येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काहींना रिपोर्ट्समध्ये फेरफार होण्याची शक्यता वाटत आहे, तर अनेकांनी समरच्या ठाम भूमिकेचं कौतुक केलं आहे.
हे पण वाचा.. फॉरेनची पाटलीण’ फेम गिरीश परदेशीने १० वर्ष अभिनयापासून का घेतला ब्रेक? अभिनेता म्हणाला…
आता अंशुमन आपली चूक मान्य करून चिंगी आणि बाळाची जबाबदारी स्वीकारणार की पुन्हा एखादा नवा डाव खेळणार, हे आगामी भागांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील पुढील भाग प्रेक्षकांसाठी अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहेत.









