ADVERTISEMENT

मोठ्या सुनेचा माज उतरवणार!सिद्धू-भावनाचा निलांबरीला थेट इशारा; ‘लक्ष्मी निवास’मध्ये मोठा ट्विस्ट

lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist : “गाडे पाटलांच्या धाकट्या सुनेचा शब्द आहे…” म्हणत भावनाने निलांबरीला थेट इशारा दिला आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये निलांबरीच्या विजयानंतर घरात मोठा संघर्ष रंगणार असल्याचे दिसत असून सिद्धू आणि भावना तिचा अहंकार मोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist

lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist : ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली असून प्रत्येक भागात येणारे नवे ट्विस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. कौटुंबिक नातेसंबंध, सत्तेचा खेळ, भावनिक संघर्ष आणि प्रत्येक पात्राचा वेगळा स्वभाव यामुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालली आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना आणखी एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर मालिकेबद्दल मोठी चर्चा रंगली आहे.

मालिकेच्या कथानकात सध्या अनेक घडामोडी एकाच वेळी सुरू आहेत. जान्हवीने जयंतशी लग्न केल्यानंतर तिच्या वागण्यात मोठा बदल पाहायला मिळत आहे. जयंतने पूर्वी तिला दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी ती त्यालाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून त्रास देताना दिसत आहे. या सगळ्या खेळात विश्वा तिची साथ देत असल्याचेही मालिकेत दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास कुटुंबासाठी झटताना दिसत आहेत, तर भावना सामाजिक कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.

भावनाच्या राजकीय प्रवासात सिद्धू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मात्र, घरातील मोठी सून निलांबरीला हे अजिबात पसंत नाही. घरात भावना आणि सिद्धूला मिळणारा सन्मान तिच्या डोळ्यात खुपत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वीही निलांबरीने अनेक कट-कारस्थाने रचली होती, पण प्रत्येक वेळी तिचे डाव उलटले. आता मात्र परिस्थिती बदललेली दिसत आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये निलांबरी निवडणुकीत विजयी झालेली दाखवण्यात आली आहे. तिच्या गळ्यात हार असून ती विजयाच्या आनंदात रंगलेली दिसते. इतकंच नाही तर ती घरातील सासऱ्यांचा फोटो काढून फेकून देते आणि घरात आता फक्त तिचाच दबदबा राहील, असा सूर लावते. मात्र, हा अपमान सिद्धू आणि भावना शांतपणे सहन करत नाहीत. निलांबरीने फेकलेला फोटो ते दोघे खाली पडू देत नाहीत आणि त्यानंतर मालिकेतला सर्वात दमदार संवाद ऐकायला मिळतो.

भावना निलांबरीला थेट इशारा देत म्हणते, “गाडे पाटलांच्या धाकट्या सुनेचा शब्द आहे, हा फोटो मी पुन्हा स्वतःच्या हाताने इथे लावणार.” त्यावर सिद्धूही निलांबरीला सुनावताना दिसतो. “तुमच्या खोट्या विजयचा माज उतरवणार,” असे तो ठामपणे सांगतो. या संवादांमुळे आगामी भागात मोठा संघर्ष रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

हे पण वाचा.. ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट! सायलीसमोर उलगडणार तिच्याच भूतकाळाचं रहस्य; प्रतिमाच्या एका गोष्टीने बदलणार सगळं

lakshmi niwas upcoming twist siddhu bhavana vs nilambari promo twist

या प्रोमोला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक प्रेक्षकांनी सिद्धू आणि भावनाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. काहींनी निलांबरीच्या व्यक्तिरेखेवर संताप व्यक्त केला आहे, तर काही प्रेक्षक पुढे नेमकं काय होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. आता सिद्धू आणि भावना निलांबरीला कशाप्रकारे धडा शिकवणार आणि गाडे-पाटील कुटुंबात पुढे कोणते नवे वाद निर्माण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा.. पुन्हा येणार ‘होम मिनिस्टर’? आदेश बांदेकरांच्या कमबॅकची जोरदार चर्चा!