ADVERTISEMENT

सावळ्याची जणू सावली’मधील ऑनस्क्रीन वाद, पण ऑफस्क्रीन जिव्हाळा! प्राप्ती रेडकरने सांगितलं सुलेखा तळवलकर यांच्याबद्दल खास

savalyachi janu savli prapti redkar sulekha talwalkar offscreen bonding : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सतत वाद घालणाऱ्या सावली आणि तिलोत्तमाचं ऑफस्क्रीन नातं मात्र खूप खास आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकरने सुलेखा तळवलकर यांच्या स्वभावाबद्दल केलेलं कौतुक सध्या चर्चेत आलं आहे.
savalyachi janu savli prapti redkar sulekha talwalkar offscreen bonding

savalyachi janu savli prapti redkar sulekha talwalkar offscreen bonding : ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय झाले आहे. विशेषतः सावली आणि तिलोत्तमा यांच्यातील संघर्ष प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. मालिकेत या दोघींमध्ये कायम वाद, गैरसमज आणि तणावाचे प्रसंग पाहायला मिळतात. मात्र पडद्यावर सतत एकमेकींशी भिडणाऱ्या या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील नाते अगदी उलट असल्याचे समोर आले आहे.

मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे, तर तिलोत्तमाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलेखा तळवलकर झळकत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दोघींनी त्यांच्या ऑफस्क्रीन नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी प्राप्तीने सुलेखा तळवलकर यांच्याबद्दल बोलताना भरभरून कौतुक केले.

प्राप्ती म्हणाली की, सेटवर सुलेखा ताईंचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. त्या सर्व कलाकारांची मनापासून काळजी घेतात. शूटिंगदरम्यान त्या नेहमी वेगवेगळे खाऊ घेऊन येतात आणि सगळ्यांना आग्रहाने देतात. त्यामुळे सेटवर एक वेगळंच घरगुती वातावरण तयार होतं. प्राप्तीने पुढे सांगितले की, इतक्या अनुभवी अभिनेत्री असूनही सुलेखा तळवलकर कधीच कोणावर आपला अनुभव लादत नाहीत. अनेक वरिष्ठ कलाकार सतत सूचना देताना दिसतात, पण सुलेखा ताई अत्यंत शांत आणि समजूतदार पद्धतीने वागतात.

त्यांच्या या साधेपणामुळे आणि सहकार्याच्या स्वभावामुळे सेटवरील सर्व कलाकार त्यांच्याशी पटकन जोडले जातात. प्राप्तीने असेही सांगितले की, सुलेखा ताईंनी बनवलेले चिकन तिला खूप आवडते. त्यामुळे शूटिंगच्या वेळी अभिनयासोबत खाण्याच्या गप्पाही रंगत असतात.

याच मुलाखतीत सुलेखा तळवलकर यांनीही प्राप्ती आणि इतर कलाकारांविषयी प्रेम व्यक्त केले. सध्या शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने सर्व कलाकार एकत्र कमी वेळ घालवतात. मात्र, प्राप्ती आणि इतर सहकलाकार सेटवर असले की वातावरण अधिक उत्साही आणि जिवंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची उणीव जाणवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

हे पण वाचा.. ओवी-अबीरमुळे सारंग आणि सावली पुन्हा समोरासमोर; आता मिटणार का गैरसमज?

savalyachi janu savli prapti redkar sulekha talwalkar offscreen bonding

मालिकेत नुकतीच काही बालकलाकारांची एंट्री झाली असून त्यांच्याबरोबरही छान नातं तयार झाल्याचे सुलेखा तळवलकर म्हणाल्या. लहान मुलांची समज, अभिनयातील पकड आणि पटकन संवाद पाठ करण्याची क्षमता पाहून त्यांना विशेष आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, प्राप्ती रेडकरला खऱ्या आयुष्यात कशी सासू हवी, असा प्रश्नही मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तिने मजेशीर उत्तर दिलं. सुलेखा तळवलकर किंवा मेघा ताईंसारखी सासू मिळाली तर त्या नक्कीच आपल्या चांगल्या मैत्रिणी होतील, असं प्राप्तीने हसत सांगितलं. एकत्र फिरणं, मेकअपच्या गप्पा मारणं आणि आवडत्या गोष्टी शेअर करणं तिला आवडेल, असंही ती म्हणाली.

हे पण वाचा.. शॉर्ट बॉडीकॉन लूकमध्ये, हातात दारूची बाटली घेऊन ‘निलांबरी’ची एन्ट्री!

सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुढील भागांमध्ये सावली आणि तिलोत्तमाच्या नात्यात आणखी कोणते बदल घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.