apurva nemlekar emotional post about marriage and maher home : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अपूर्वा यावेळी एका अतिशय संवेदनशील विषयावर व्यक्त झाली आहे. तिने नुकतीच शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक महिला तिच्या विचारांशी सहमत असल्याचं दिसून येत आहे.
आजच्या आधुनिक काळातही अनेक महिलांना लग्नानंतर सासरी मानसिक त्रास, दबाव, अपमान किंवा अवास्तव अपेक्षांचा सामना करावा लागतो. काही वेळा परिस्थिती इतकी कठीण बनते की महिलांना स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटू लागतं. अशा परिस्थितीत माहेरी परत जाणं म्हणजे अपयश नसून स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेला धाडसी निर्णय आहे, असा महत्त्वाचा संदेश अपूर्वाने आपल्या पोस्टमधून दिला आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अनेक मुली लग्नानंतर मोठ्या अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांना फक्त प्रेम, आदर आणि भावनिक सुरक्षितता हवी असते. मात्र, काही वेळा त्यांनाच सतत तडजोड करावी लागते. अशा वेळी समाजाच्या भीतीने सगळं सहन करण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं अधिक गरजेचं असतं.
अपूर्वाने माहेरच्या पाठिंब्याचं महत्त्वदेखील अधोरेखित केलं आहे. “मुलींना हे नक्की सांगा की, अडचणीत असताना माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले आहेत,” असा संदेश तिने पालकांना दिला आहे. स्वतःच्या आयुष्यातही कठीण काळात कुटुंबाने साथ दिल्यामुळेच ती नव्याने उभी राहू शकली, असं तिने भावनिक शब्दांत नमूद केलं आहे.
तिच्या पोस्टमधील “स्वतःला गमावणं हेच खरं अपयश आहे” ही ओळ विशेष चर्चेत आली आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्या धाडसी भूमिकेचं कौतुक केलं आहे. काही महिलांनी स्वतःचे अनुभवही शेअर करत अपूर्वाच्या विचारांना पाठिंबा दिला.
हे पण वाचा.. ठरलं तर मग”च्या २५ सेकंदांच्या प्रोमोसाठी टीमची जबरदस्त मेहनत! जुई गडकरीने शेअर केला खास BTS व्हिडीओ
apurva nemlekar emotional post about marriage and maher home
दरम्यान, अपूर्वा नेमळेकर सध्या पद्मिनी या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी तिने रात्रीस खेळ चाले, शुभविवाह आणि प्रेमाची गोष्ट यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
हे पण वाचा.. मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती! अंशुमन विचारेने घेतली लाखोंची आलिशान कार









