ADVERTISEMENT

सायलीच खरी तन्वी? ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीच्या एका वाक्याने उलगडणार मोठं रहस्य

sayali khari tanvi purna aaji motha khulasa : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया उर्फ बबली लोखंडेचा खोटेपणा समोर आल्यानंतर आता कथेला नवं वळण मिळालं आहे. पूर्णा आजीच्या आठवणींमधून सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत मिळू लागल्याने अर्जुनसह संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरलं आहे.
sayali khari tanvi purna aaji motha khulasa

sayali khari tanvi purna aaji motha khulasa : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अनेक दिवसांपासून तन्वी बनून सुभेदार कुटुंबात राहणाऱ्या प्रियाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची खरी ओळख बबली लोखंडे असल्याचं समोर आलं आणि संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या घटनेचा सर्वाधिक परिणाम पूर्णा आजींवर झालेला पाहायला मिळत आहे.

पूर्णा आजींचा आपल्या नात तन्वीवर लहानपणापासून जीवापाड प्रेम असतं. त्यामुळे इतके दिवस घरात राहणारी मुलगी खरी तन्वी नसून दुसरीच व्यक्ती आहे, हे सत्य त्यांना सहन होत नाही. या मानसिक धक्क्यामुळे त्यांची स्मृती हरवल्यासारखी अवस्था झाली आहे. मात्र, या सगळ्या गोंधळात एक अशी घटना घडते ज्यामुळे मालिकेची कथा पूर्णपणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

पूर्णा आजी सतत सायलीला ‘तन्वी’ म्हणून हाक मारू लागतात. सुरुवातीला सगळ्यांना हा फक्त त्यांच्या विस्मरणाचा परिणाम वाटत असतो. सायली, अर्जुन आणि घरातील इतर सदस्य त्यांना खरी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्णा आजी कोणाचंही ऐकून घेत नाहीत. अखेर त्यांच्या तब्येतीचा विचार करून सायली स्वतःला तन्वी असल्याचं भासवत त्यांना सांभाळण्याचा निर्णय घेते.

दरम्यान, मालिकेत एक महत्त्वाचा प्रसंग घडतो. पूर्णा आजी प्रेमाने सायलीला बालपणीचं गाणं म्हणायला सांगतात. त्या स्वतः “चांदोबा चांदोबा भागलास का?” या ओळी म्हणायला सुरुवात करतात. त्यानंतर सायली नकळत पुढील ओळी चुकीच्या पद्धतीने म्हणते. विशेष म्हणजे, हाच शब्दांचा गोंधळ लहानपणी खरी तन्वी करत असे, अशी आठवण पूर्णा आजी सांगतात.

सायलीच्या तोंडून त्या ओळी ऐकताच अर्जुन, प्रतिमा, रविराज आणि कल्पना हे सगळेच अवाक् होतात. कारण सायलीला तन्वीच्या बालपणीच्या सवयी किंवा चुका माहिती असण्याचं कोणतंही कारण नसतं. यामुळे अर्जुनच्या मनात पुन्हा एकदा मोठी शंका निर्माण होते. सायलीच खरी तन्वी असू शकते का? हा प्रश्न आता त्याला सतावू लागतो.

हे पण वाचा.. निवेदिता सराफांचं ५ वर्षांनी कमबॅक; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार

sayali khari tanvi purna aaji motha khulasa

दुसरीकडे सायलीलाही या गोष्टीचा धक्का बसतो. आश्रमात असताना आपणही हेच गाणं अशाच चुकीच्या शब्दांत म्हणायचो, अशी आठवण तिच्या मनात जागी होते. त्यामुळे हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही मोठं सत्य दडलंय, याचा विचार ती करू लागते.

हे पण वाचा.. त्याच्या मनात जे असतं ते तो लगेच बोलतो, पूर्वा कौशिकने सांगितली प्रसाद जवादेची खास सवय

मालिकेच्या आगामी भागांमध्ये सायलीच्या भूतकाळाशी संबंधित अनेक गुपितं उलगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुढचा ट्विस्ट नेमका काय असणार आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य कधी समोर येणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.