ADVERTISEMENT

संध्याकाळी ७ नंतर जेवत नाही ; ‘शुभश्रावणी’ फेम वल्लरी विराजचा फिटनेस मंत्र चर्चेत, नाश्त्यात खाते घरगुती पदार्थ

vallari viraj breakfast diet routine actress fitness secret : ‘शुभश्रावणी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज सध्या तिच्या अभिनयाइतकीच फिटनेस आणि डाएट रुटीनमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधून तिच्या नाश्त्यातील पदार्थांची झलक पाहायला मिळाली असून, ती आरोग्यदायी आणि घरगुती खाण्यावर भर देत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
vallari viraj breakfast diet routine actress fitness secret

vallari viraj breakfast diet routine actress fitness secret : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शुभश्रावणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री वल्लरी विराज सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. अभिनयासोबतच तिची साधी राहणी, फिटनेसकडे असलेलं लक्ष आणि हेल्दी लाइफस्टाइल यामुळे चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे. वल्लरी सोशल मीडियावर नियमितपणे सक्रिय असते आणि शूटिंग सेटवरील मजेशीर क्षणांपासून ते वैयक्तिक आयुष्यातील छोट्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये तिच्या नाश्त्याची झलक पाहायला मिळाली आणि त्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या डाएट रुटीनची चर्चा सुरू झाली. वल्लरीच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये उकडलेली अंडी, ओट्स, दही, कॉफी, आमरस आणि थेपल्यासारखे घरगुती पदार्थ दिसून आले. अभिनेत्रीचा आहार पाहून ती फिटनेससाठी बाहेरील फॅन्सी डाएटपेक्षा पौष्टिक आणि घरच्या जेवणाला अधिक महत्त्व देते, हे स्पष्ट झालं.

वल्लरीने याआधी दिलेल्या एका मुलाखतीतही तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल खुलासा केला होता. फिट राहण्यासाठी ती नियमित डाएट फॉलो करते, मात्र स्वतःला खवय्ये मानत असल्याने अनेकदा आवडत्या पदार्थांवर नियंत्रण ठेवणं तिच्यासाठी कठीण जातं, असं तिने सांगितलं होतं. विशेष म्हणजे तिला माशांचे पदार्थ खूप आवडतात, असंही तिने हसत सांगितलं होतं.

अभिनेत्रीच्या दैनंदिन दिनक्रमात घरच्या जेवणाला विशेष स्थान आहे. वल्लरीच्या म्हणण्यानुसार, तिची आई रोज शूटिंग सेटवर तिच्यासाठी डबा पाठवते. त्या डब्यात फळं, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि मधल्या वेळेस खाण्यासाठी हलके पदार्थ असतात. दही हा तिच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असून, दह्याशिवाय तिचं जेवण पूर्णच होत नाही, असं ती सांगते.

वल्लरीच्या फिटनेस रुटीनमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिच्या जेवणाची वेळ. अभिनेत्री संध्याकाळी सात वाजण्यापूर्वीच रात्रीचं जेवण पूर्ण करते. सातनंतर काहीही खात नसल्याचं तिने मुलाखतीत स्पष्ट सांगितलं होतं. योग्य वेळेत जेवण आणि नियंत्रित आहारामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, असं तिचं मत आहे.

हे पण वाचा.. ठरलं तर मगच्या ३ अभिनेत्री पोहोचल्या शेगावला; जुई गडकरी म्हणाली, त्यांनी बोलावल्याशिवाय जाणं होत नाही!

vallari viraj breakfast diet routine actress fitness secret

फक्त अभिनयच नाही तर वल्लरीला स्वयंपाकाचीही आवड आहे. ती स्वतः चिकनसारखे मांसाहारी पदार्थ बनवते आणि तिच्या हातच्या पदार्थांचं घरात कौतुकही होतं. याशिवाय थालीपीठ आणि मसालेभात हे पदार्थ तिला उत्तम बनवता येतात, असंही अभिनेत्रीने सांगितलं आहे.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये प्रेमाचा मोठा ट्विस्ट! स्वानंदीनं अखेर समरसमोर व्यक्त केल्या भावना

सध्या वल्लरी विराजच्या या हेल्दी लाइफस्टाइलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून तिच्या साधेपणाचं आणि फिटनेसकडे असलेल्या दृष्टिकोनाचं कौतुक केलं जात आहे.