ADVERTISEMENT

जुई गडकरीची ऑनस्क्रीन सासूबरोबर ट्रिप; प्रियांका तेंडोलकरही सोबत, फोटो व्हायरल

tharala tar mag actress jui gadkari trip with prajakta dighe and priyanka tendolkar : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जुई गडकरीने ऑनस्क्रीन सासू प्राजक्ता दिघे आणि अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरसोबत ट्रिपला जातानाचा फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
tharala tar mag actress jui gadkari trip with prajakta dighe and priyanka tendolkar

tharala tar mag actress jui gadkari trip with prajakta dighe and priyanka tendolkar : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेतील प्रत्येक कलाकाराने घराघरांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिकेतील नातेसंबंध, भावनिक प्रसंग आणि कलाकारांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते. मात्र पडद्यावर दिसणारं हे नातं फक्त अभिनयापुरतंच मर्यादित नसून ऑफस्क्रीनदेखील कलाकारांमध्ये तितकंच घट्ट मैत्रीचं नातं तयार झालं आहे. याची झलक आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे.

मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत मालिकेतील ऑनस्क्रीन सासूची भूमिका निभावणारी अभिनेत्री प्राजक्ता दिघे आणि मालिकेतील खलनायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर दिसत आहेत. तिघीही एकत्र ट्रेनमधून प्रवास करताना दिसत असून त्यांच्या या ट्रिपची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

जुईने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शननेही अनेकांचं लक्ष वेधलं. तिने लिहिलं की, ही ट्रिप जवळपास तीन वर्षांपूर्वी ठरली होती, मात्र आता अखेर एकत्र फिरायला जाण्याचा योग आला. त्यामुळे या ट्रिपचं महत्त्व तिघींसाठी किती खास आहे, याची कल्पना चाहत्यांना आली. जरी त्यांनी नेमकं कोणत्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला आहे हे उघड केलं नसले, तरी सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’च्या सेटवर कलाकारांची मस्ती आणि धमाल कायम चर्चेत असते. विशेषतः महिला कलाकारांचा एक वेगळाच ग्रुप तयार झाला असून त्यांचं बॉण्डिंग अतिशय खास असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेतील अभिनेत्री मोनिका दबाडेच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सेटवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्या फोटोंनंतरही चाहत्यांनी कलाकारांच्या मैत्रीचं कौतुक केलं होतं.

एका मुलाखतीत जुई गडकरीने सेटवरील मैत्रीबद्दल बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. शूटिंगदरम्यान कोणाचा मूड खराब असेल किंवा एखादी व्यक्ती तणावात असेल, तर बाकी सगळेजण तिला आधार देतात, असं तिने सांगितलं होतं. कलाकारांमध्ये एकमेकांबद्दल असलेली ही भावना त्यांचं नातं अधिक घट्ट करत असल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.

हे पण वाचा.. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावची खास पोस्ट; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसाठी व्यक्त केलं प्रेम

tharala tar mag actress jui gadkari trip with prajakta dighe and priyanka tendolkar

जुईने मुलाखतीत आणखी एक मजेशीर किस्साही सांगितला होता. मालिकेतील सगळ्या अभिनेत्री एकत्र बसून सतत गप्पा मारत असतात आणि त्यांच्या मस्तीमुळे सेटवरील पुरुष कलाकार कधी कधी कंटाळतात, असं ती हसत हसत म्हणाली होती. शूटिंग संपल्यानंतरही सगळ्या जणी स्टडी रूममध्ये एकत्र वेळ घालवतात, त्यामुळे त्यांच्या मैत्रीचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचं पाहायला मिळतं.

हे पण वाचा.. उन्हाच्या झळांमध्येही गौरी कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज; ‘ब्लॅक अँड ब्युटीफुल’ फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

आता या तिघींच्या ट्रिपचे आणखी फोटो आणि व्हिडीओ समोर येणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर जुई, प्राजक्ता आणि प्रियांकाच्या या खास ट्रिपची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.