ADVERTISEMENT

७००-८०० ऑडिशन, ४-५ वर्षांचा संघर्ष मंदार जाधव, भावामुळे मिळाली पहिली मालिका

mandar jadhav 4-5 years audition struggle : पहिली मालिका सहज मिळाली, पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली, असं सांगत अभिनेता मंदार जाधवने त्याच्या करिअरमधील संघर्षकाळ उलगडला
mandar jadhav 4-5 years audition struggle

mandar jadhav 4-5 years audition struggle : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता “मंदार जाधव” आज यशाच्या शिखरावर दिसत असला तरी त्यामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मंदारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरमधील चढ-उतारांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.

मंदारची अभिनय क्षेत्रात एन्ट्री ही ठरवून झालेली नव्हती. खरं तर तो आपल्या लहान भावासोबत ऑडिशनला गेला होता. मात्र, तिथेच त्याला संधी मिळाली आणि त्याने ती लगेच स्वीकारली. ‘अल्लादीन’ या हिंदी मालिकेतून त्याने अभिनयाची सुरुवात केली. विशेष म्हणजे, पहिली संधी मिळवण्यासाठी त्याला फारसा संघर्ष करावा लागला नाही.

परंतु, खरी लढाई त्यानंतर सुरू झाली. पहिली मालिका संपल्यानंतर त्याला अपेक्षेप्रमाणे काम मिळालं नाही. त्या काळात त्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली. इंडस्ट्रीतील स्पर्धा, दिसणं आणि फिटनेस यांचं महत्त्व त्याला जाणवलं. ऑडिशनला जाताना त्याला वारंवार नकार मिळत होते. “तू खूप बारीक आहेस, आधी शरीर बनव,” असे सल्ले त्याला ऐकावे लागत होते.

हे पण वाचा.. सायलीचा संताप अनावर! प्रियाच्या खोटेपणाचा अखेर पर्दाफाश, प्रेक्षक म्हणतात – आता खरी मजा सुरू

या सगळ्या परिस्थितीत हार न मानता मंदारने स्वतःमध्ये बदल घडवून आणला. तब्बल चार ते पाच वर्षांच्या काळात त्याने सुमारे “७००-८०० ऑडिशन” दिल्या. अनेक वेळा अपयश आलं, पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. त्याच्या मते, कलाकार म्हणून टिकून राहण्यासाठी सातत्य आणि मेहनत खूप महत्त्वाची असते.

मंदारने आपल्या कुटुंबाचा उल्लेख करत सांगितलं की, घरची परिस्थिती ठीक होती आणि आई-वडिलांचा पाठिंबा कायम मिळाला. वडीलही या क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना या संघर्षाची जाणीव होती. त्यामुळेच मंदारला मानसिक बळ मिळालं.

हे पण वाचा.. लग्नाच्या प्रेशरवर प्राजक्ता माळीची स्पष्ट भूमिका; ‘योग्य वेळ आली की सगळं घडेल

mandar jadhav 4-5 years audition struggle

आज मंदार जाधवने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रवास हा नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यश सहज मिळत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, हे त्याच्या कहाणीतून स्पष्ट होतं.