ADVERTISEMENT

सायलीचा संताप अनावर! प्रियाच्या खोटेपणाचा अखेर पर्दाफाश, प्रेक्षक म्हणतात – आता खरी मजा सुरू

sayali exposes priya truth tharala tar mag serial : ठरलं तर मग मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सायलीने प्रियाच्या खोट्या चेहऱ्याचा पर्दाफाश करत तिला दिला जबरदस्त धडा.
sayali exposes priya truth tharala tar mag serial

sayali exposes priya truth tharala tar mag serial : मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “ठरलं तर मग” ही मालिका सध्या अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या प्रसंगाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आता मालिकेत पाहायला मिळत आहे. कथानकातील प्रमुख खलनायिका प्रिया हिचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड झाल्याने कथेला एक नवं वळण मिळालं आहे.

प्रिया गेल्या अनेक वर्षांपासून तन्वी बनून सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबांची फसवणूक करत होती. पैशासाठी आणि स्वार्थासाठी तिने प्रत्येक नात्याशी खेळ केला. मात्र तिची खरी ओळख म्हणजे बबली लोखंडे असल्याचं सायली आणि अर्जुन यांनी अखेर उघड केलं. या खुलाशामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं असून प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्जुनला अडचणीत आणण्यासाठी आणि सायलीला एकटी पाडण्यासाठी प्रियाने अनेक कट रचले होते. पण यावेळी सायली एकटी पडली नाही. तिला साथ मिळाली ती तिच्या मैत्रिणींची. विशेष म्हणजे मालिकेत विविध नायिका एकत्र येऊन सायलीला मदत करताना दिसत आहेत, ज्यामुळे प्रियाचे सर्व डाव फसले.

प्रिया तिचं गुपित लपवण्यासाठी स्वतःच्या आई-वडिलांनाही धोका देण्याचा प्रयत्न करते, इतकी ती निर्दयी बनलेली दिसते. मात्र सायलीच्या चातुर्यामुळे तिचा हा प्लॅनही अपयशी ठरतो. अखेर सर्व पुरावे समोर आल्यानंतर सायलीचा संताप अनावर होतो आणि ती प्रियाला सर्वांसमोर चांगलाच धडा शिकवते.

प्रोमोमध्ये सायलीचा आक्रमक अवतार पाहायला मिळतो. ती प्रियाला जाब विचारते आणि तिच्या खोटेपणासाठी तिला जबरदस्त सुनावते. इतकंच नाही, तर सायली तिला कानाखाली देत तिच्या प्रत्येक चुकीची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही देते. हा सीन पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत.

हे पण वाचा.. लग्नाच्या प्रेशरवर प्राजक्ता माळीची स्पष्ट भूमिका; ‘योग्य वेळ आली की सगळं घडेल

सोशल मीडियावर या प्रोमोची जोरदार चर्चा सुरू आहे. “आता खरी मजा येणार”, “सायलीचा हा अवतार भन्नाट आहे”, “प्रियाला अजून शिक्षा मिळायला हवी” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अनेकांनी सायलीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

हे पण वाचा.. राकेश बापटचा खुलासा; लहानपणापासून डिस्लेक्सियाशी झुंज

sayali exposes priya truth tharala tar mag serial

आता पुढे कथानक कोणत्या दिशेने जाणार, प्रियाला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळणार का, की ती पुन्हा काहीतरी डाव रचून स्वतःची सुटका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी भागांमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.