vidisha mhasakar kedarnath trek : उत्तराखंडमधील पवित्र “केदारनाथ धाम” हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. अत्यंत कठीण आणि खडतर असलेल्या या यात्रेसाठी काही जण हेलिकॉप्टरचा पर्याय निवडतात, तर अनेक श्रद्धाळू पूर्ण ट्रेक पायी करत देवदर्शनाचा आनंद घेतात. यंदा २२ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, यात्रेचा उत्साह पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री “विदिशा म्हसकर” हिनेही नुकतीच ही कठीण यात्रा पूर्ण केली आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेनंतर थोडा मोकळा वेळ मिळाल्याने तिने केदारनाथ यात्रेचा निर्णय घेतला. या प्रवासातील तिचे अनुभव आणि क्षण तिने सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
विदिशाने पहाटे ४ वाजता ट्रेकला सुरुवात केली. त्यासाठी तिला मध्यरात्री २ वाजताच उठावं लागलं होतं. सुरुवातीपासूनच तिच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. मात्र, हा प्रवास किती कठीण आहे, याची जाणीव तिला पुढे जाऊन झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल ५ तास चालल्यानंतरही ती फक्त ४ किलोमीटर अंतर पार करू शकली होती.
हे पण वाचा.. बाई तुझा आशीर्वाद टीमचा नाशिकमध्ये गोदा आरतीचा दिव्य अनुभव; रामकुंडावर घेतले आशीर्वाद
या ट्रेकदरम्यान अनेक भाविक घोड्यांच्या सहाय्याने प्रवास करत असल्याने पायी चालणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबतही विदिशाने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “कधी कधी हा ट्रेक माणसांचा आहे की घोड्यांचा, हेच कळत नाही. घोडे अचानक पुढून जातात आणि आपल्याला बाजूला व्हावं लागतं.”
दुपारी साडे दोन वाजेपर्यंत ती मंदिरापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. अखेर जवळपास १२ तासांच्या कठीण प्रवासानंतर तिने केदारनाथ धाम गाठलं. इतका थकवणारा प्रवास केल्यानंतर जेव्हा मंदिराचं दर्शन होतं, तेव्हा सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो, असं ती सांगते. मंदिर पाहताच तिच्या भावना अनावर झाल्याचं तिच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली” मालिकेतील कलाकारांचा दाक्षिणात्य अवतार चर्चेत; सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
vidisha mhasakar kedarnath trek
दरम्यान, गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही अनेक मराठी कलाकार “केदारनाथ यात्रा” करण्यासाठी जाणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मागील वर्षी प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर आणि मंजिरी ओक यांनीही येथे दर्शन घेतलं होतं. त्यामुळे यंदाच्या यात्रेत आणखी कोणते कलाकार सहभागी होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.









