ADVERTISEMENT

मराठी सक्तीवर कमळी फेम अभिनेत्री सुषमा जयवंतची स्पष्ट भूमिका; “आपणच…”

marathi language mandatory rule sushma jaywant reaction : मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर अभिनेत्री सुषमा जयवंतने प्रश्न उपस्थित करत स्वतःच्या भाषेविषयीच्या आपल्या वर्तनावरच विचार करण्याचे आवाहन केले आहे.
marathi language mandatory rule sushma jaywant reaction

marathi language mandatory rule sushma jaywant reaction : राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी “मराठी” भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या १ मेपासून हा नियम लागू करण्याची घोषणा करण्यात आली असून, मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चालक संघटनांनी याला विरोध दर्शवत संपाचा इशाराही दिला आहे, तर मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी या विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

याच संदर्भात ‘कमळी’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुषमा जयवंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

सुषमा जयवंतने या निर्णयाला पूर्णपणे विरोध न करता, त्यातील काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या मते, जर मराठी भाषा येणे अनिवार्य असेल, तर परवाना देताना ही अट का लावली जात नाही? चालकांना परवाना मिळाल्यानंतरच अशा नियमांची सक्ती का केली जाते, असा सवाल तिने उपस्थित केला.

तसेच तिने समाजातील मराठी भाषिकांच्या वर्तनावरही भाष्य केले. दैनंदिन व्यवहारात अनेक मराठी लोक स्वतःहून हिंदी किंवा इतर भाषांचा वापर करतात, हे वास्तव तिने अधोरेखित केले. “आपण स्वतः मराठी बोलण्यास कचरतो आणि इतरांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा करतो, यात तर्क कुठे आहे?” असा थेट प्रश्न तिने विचारला.

याशिवाय, शिक्षणाच्या माध्यमाबाबतही तिने मुद्दा उपस्थित केला. आपल्या मुलांना मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याची वाढती प्रवृत्ती पाहता, भाषेच्या जपणुकीबाबत आपण किती प्रामाणिक आहोत, याचा विचार करायला हवा, असे ती म्हणाली.

हे पण वाचा.. अभिनेत्री गायत्री दातार लवकरच करणार लग्न; मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर

सुषमाने शेवटी या विषयावर वाद घालण्याऐवजी चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “तू चुकीचा आहेस, मी बरोबर आहे” अशा भूमिकेपेक्षा सर्वांनी आत्मपरीक्षण करून यावर विचार करावा, असे आवाहन तिने केले.

हे पण वाचा.. One Last Time…! ‘नशीबवान’ मालिकेचा शेवट; नेहा नाईकची भावुक पोस्ट

marathi language mandatory rule sushma jaywant reaction

दरम्यान, या निर्णयावर इतर काही कलाकारांनीही आपली मते व्यक्त केली असून, “मराठी” भाषा आणि तिच्या वापराबाबत समाजात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. हा मुद्दा केवळ नियमांपुरता मर्यादित न राहता, आपल्या दैनंदिन जीवनातील भाषिक सवयींवरही प्रकाश टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे.