nashibwan serial off air final episode update : मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या टीआरपीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मालिकांच्या वेळांमध्ये बदल होत असून काही मालिका अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अल्पावधीतच बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. अशाच एका मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. “स्टार प्रवाह” वाहिनीवरील “नशीबवान” ही मल्टिस्टारर मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, सोनाली खरे आणि नेहा नाईक यांसारख्या दमदार कलाकारांची फौज या मालिकेत पाहायला मिळाली. सुरुवातीला या मालिकेला रात्री ९ वाजताचा प्राइम स्लॉट देण्यात आला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात ही मालिका अपयशी ठरली.
टीआरपीच्या स्पर्धेत “झी मराठी”वरील “कमळी” मालिकेने “नशीबवान”ला मागे टाकल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, वाहिनीने या मालिकेची वेळ बदलून ती दुपारच्या स्लॉटमध्ये हलवली. तरीही परिस्थितीत विशेष सुधारणा न झाल्याने अखेर ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा.. राखी सावंतच्या वक्तव्यांवर दिपाली सय्यदचा संताप; ‘संसार टिकवणं सोपं नाही’
दरम्यान, “नशीबवान”च्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये मोठा थरार पाहायला मिळतो. कथानकानुसार नागेश्वर हा गिरिजा आणि तिच्या आईला संपवण्यासाठी त्यांच्या घराला आग लावतो. मात्र, त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटतो. रुद्रप्रताप योग्य वेळी येऊन आपल्या पत्नीला वाचवतो. संकटातून सुटल्यावर गिरिजा नागेश्वरला सांगते की महत्त्वाची कागदपत्रे घरातच राहिली आहेत. मालमत्तेच्या लालसेने पछाडलेल्या नागेश्वर पुन्हा आगीत उडी घेतो आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत होतो.
“नशीबवान” मालिकेचा शेवटचा भाग २५ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी २७ एप्रिलपासून “तुझ्या सोबतीने” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, “वचन दिले तू मला” ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता ऑन एअर होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
हे पण वाचा.. राखी सावंत”बद्दल विशाल कोटियनचं मोठं वक्तव्य; झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच…
nashibwan serial off air final episode update
एकूणच, “नशीबवान” मालिकेचा अल्पावधीत झालेला शेवट हा प्रेक्षकांसाठी धक्का मानला जात आहे. तरीही अंतिम भागातील नाट्यमय वळणामुळे ही मालिका शेवटपर्यंत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही.









