bigg boss marathi 6 dp dada support anushree mane finale : “बिग बॉस मराठी ६” चा अंतिम टप्पा आता अधिक रंगतदार होत चालला आहे. काहीच दिवसांत या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या या महाअंतिम सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या घरात उरलेले सहा स्पर्धक – तन्वी कोलते, राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि रेवा कौरासे – यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
फिनालेपूर्वी मिड-वीक एव्हिक्शन होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक स्पर्धकासाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरत आहे. सोशल मीडियावर सर्वच स्पर्धकांचे चाहते आपल्या आवडत्या सदस्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे, यंदा स्पर्धा अधिक तगडी असल्याने कोण जिंकणार याचा अंदाज बांधणंही कठीण झालं आहे.
दरम्यान, मागील सीझनमधील फायनलिस्ट आणि प्रेक्षकांचा लाडका DP दादा म्हणजेच धनंजय पोवार यानेही या चर्चेत उडी घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत यंदाच्या स्पर्धकांबद्दल आपलं मत मांडलं आहे. सध्या तन्वी कोलते आणि राकेश बापट यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत असला, तरी DP दादाने वेगळी भूमिका घेत अनुश्री मानेला सपोर्ट करण्याचं आवाहन केलं आहे.
धनंजय पोवारने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या सीझनमध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच तो आणि त्याचे सहकारी टॉप-५ पर्यंत पोहोचू शकले. त्याने विशेषतः सूरज चव्हाणचा उल्लेख करत सांगितलं की, प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच तो विजेता ठरला. याच पार्श्वभूमीवर यंदाही प्रेक्षकांकडे एक मोठी संधी असल्याचं त्याने अधोरेखित केलं आहे.
DP दादाच्या मते, इंडस्ट्रीतील अनेक लोक फक्त कलाकारांना पाठिंबा देतात, तर इन्फ्लुएन्सर्सकडे तुलनेने कमी लक्ष दिलं जातं. त्यामुळे यंदा हा समतोल बदलण्याची गरज असल्याचं त्याला वाटतं. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, अनुश्री मानेबद्दल असलेले मतभेद, गैरसमज किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवून तिच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे.
हे पण वाचा.. रेवा कौरसेचा बिग बॉस मराठी 6 मधील प्रवास संपला
“सगळे मतभेद विसरून अनुश्रीला सपोर्ट करा,” असं आवाहन करत त्याने प्रेक्षकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्याच्या मते, यंदाही एक इन्फ्लुएन्सर विजेता व्हावा, यासाठी ही योग्य वेळ आहे.
हे पण वाचा.. ललित प्रभाकरचं स्पष्ट मत: ‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग नकोच!
bigg boss marathi 6 dp dada support anushree mane finale
आता अंतिम निकालाच्या दिवशी कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार, याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. DP दादाच्या या भूमिकेमुळे स्पर्धेत नवं वळण येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









