ADVERTISEMENT

तारिणी मालिकेत ट्विस्ट! केदारच्या हाती पुरावा, दयानंद खरंच दोषी की कुणीतरी दुसराच?

tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist : ‘तारिणी’ मालिकेत दयानंद खांडेकरांच्या अटकेनंतर कथेला नवं वळण मिळालं आहे. तारिणी सासऱ्यांना निर्दोष सिद्ध करणार का? आणि खरा गुन्हेगार कोण आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist

tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist : ‘तारिणी’ या लोकप्रिय मालिकेत सध्या कथा अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. जयरामच्या खुनाच्या आरोपाखाली दयानंद खांडेकर यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण खांडेकर कुटुंबावर संकट कोसळलं आहे. या प्रकरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे स्वतः तारिणीनेच पोलिसांसमोर दिलेली साक्ष. घटनास्थळी दयानंद उपस्थित होते आणि त्यांच्या हातावर रक्त लागलेलं होतं, या गोष्टीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

तारिणीच्या या निर्णयामुळे घरातील इतर सदस्य तिच्यावर नाराज झाले आहेत. मात्र, केदार मात्र तिच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दिसतं. जरी तारिणीने परिस्थिती पाहून साक्ष दिली असली, तरी तिच्या मनात एक वेगळीच खात्री आहे. तिला वाटतं की दयानंद यांचा या खुनाशी काहीही संबंध नाही. पण सध्या ठोस पुरावे नसल्यामुळे ती काहीच करू शकत नाही.

दरम्यान, दयानंद यांच्यावर मानसिक ताण वाढताना दिसतो. जयराम हा केदारच्या आईचा मानलेला भाऊ असल्याने या घटनेचा परिणाम कुटुंबावर खोलवर होणार, याची त्यांना जाणीव आहे. विशेषतः, केदारला हे सत्य कळल्यानंतर तो आपल्याला कधीच माफ करणार नाही, या भीतीने दयानंद पूर्णपणे खचले आहेत. जेव्हा तारिणी त्यांना पोलीस ठाण्यात भेटायला जाते, तेव्हा ते सुनेसमोर आपलं दुःख व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून देतात. ही भावनिक भेट प्रेक्षकांच्या मनालाही भिडणारी ठरते.

तारिणी मात्र या सगळ्या परिस्थितीत खंबीर राहते. ती दयानंदांना विश्वास देते की, “मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करणारच.” पण याच वेळी कथेत नवा ट्विस्ट येतो. केदारच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागतो. एका औषध कंपनीतील गैरव्यवहाराशी संबंधित कॅसेट्स शोधताना दयानंद दिसत असल्याचा व्हिडिओ त्याला मिळतो. या व्हिडिओमुळे केदारचा गैरसमज अधिकच वाढतो आणि तो दयानंद यांनाच दोषी मानू लागतो.

केदार ही माहिती तारिणीसमोर मांडतो आणि दयानंद यांनीच जयरामचा खून केल्याचा दावा करतो. मात्र, तारिणी ठामपणे त्याला विरोध करते. ती केदारला सांगते की, तो चुकीचा निष्कर्ष काढतोय आणि सत्य काहीतरी वेगळंच आहे. ती कोणत्याही परिस्थितीत दयानंदांना निर्दोष सिद्ध करणार असल्याचं स्पष्ट करते.

हे पण वाचा.. ठरलं तर मग : प्रियाचा प्लॅन फसला, वकिलांच्या खुलाशामुळे सायली-अर्जुनचा जीव वाचला

tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist

आता खरा प्रश्न असा निर्माण होतो की, पुरावे नसताना तारिणी सत्य कसं उलगडणार? केदार तिच्यावर विश्वास ठेवेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जयरामचा खरा खुनी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हे पण वाचा.. कॅब कॅन्सल केल्यानंतर अभिनेत्री गायत्री दातारला ड्रायव्हरकडून त्रास, सोशल मीडियावर मदतीची हाक

दरम्यान, प्रेक्षकांसाठी आणखी एक खास बातमी म्हणजे ‘तारिणी’ ही मालिका आता अधिक वेळ प्रसारित होणार आहे. येत्या काही दिवसांत मालिकेचा कालावधी वाढवण्यात येणार असून प्रेक्षकांना अधिक रोमांचक भाग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.