bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad : “बिग बॉस मराठी ६” चा खेळ आता अधिकच रंगात आला असून, घरातील नातेसंबंध आणि रणनीती यामध्ये स्पष्ट बदल दिसून येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून घरातील वातावरण किती तापले आहे, याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
नॉमिनेशन टास्कदरम्यान सुरुवातीलाच विशाल आणि राकेश यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. फायनालेच्या एन्ट्री तिकीटावरून दोघांमध्ये झालेली ही धक्काबुक्की इतकी वाढते की, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागतात. त्यावेळी बिग बॉस हस्तक्षेप करत दोघांनाही शिक्षा सुनावतात आणि घरातलाल तणाव कमी झाला की, टास्क रद्द न करता तो पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय बिग बॉस कडून घेतला जातो.
यानंतर बिग बॉस तन्वीचं नाव घेऊन तिला घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करण्यासाठी टास्क रूम मध्ये बोलावतात आणि तिला बिग बॉस सांगताता तुम्ही कॅप्टन असल्यामुळे तुम्हाला विशेष अधिकार आहे त्यातून तुम्ही 3 सदस्यांना नॉमिनेट करू शकता तेव्हा कॅप्टन असलेली तन्वी तिला मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून.आपला निर्णय जाहीर करते. ती तिसऱ्या नावासाठी अनुश्रीची निवड करते, आणि इथूनच घरातील वातावरण पुन्हा एकदा तापते.
तन्वीच्या या निर्णयावर अनुश्री उघडपणे नाराजी व्यक्त करते. ती म्हणते की, स्वतःच्या ग्रुपला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या खेळाडूंना नॉमिनेट करतीयेस तुझ्या सोबत ही 3 टाळकी बसलियेत ना त्याचा”फ्लॉप गेम” असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही, तर ती तन्वीला तिच्या ग्रुपमधील सदस्यांच्या गेमबद्दलही प्रश्न विचारते
अनुश्रीच्या या वक्तव्यामुळे दीपालीचा संताप अनावर होतो. ती लगेचच अनुश्रीला थेट शब्दांत सुनावते आणि “टाळकी-बीळकी” अशा शब्दांचा वापर न करण्याचा इशारा देते. यावर अनुश्रीही शांत बसत नाही आणि ती दीपालीवर आरोप करते की, तिला फक्त वाद घालण्यासाठी मुद्दा हवा असतो.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा राडा! राकेश बापट विशाल कोटियन मध्ये होणार धक्काबुक्की
bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad
दोघींमधील हा वाद पुढे अधिकच चिघळतो. दीपाली अनुश्रीला तिचं मत मांडू देत नाही, असा आरोप करत अनुश्री चिडून जाते आणि ती दीपालीला “मंद बदक” अशी उपमा देते. या वक्तव्यानंतर घरातील वातावरण आणखी तापल्याचं दिसतं.
हे पण वाचा.. काव्या गरोदर! करिअर की बाळ? ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये मोठा निर्णय
या सगळ्या घडामोडींमुळे “Bigg Boss Marathi 6” मध्ये पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. तन्वीचा निर्णय, अनुश्रीची प्रतिक्रिया आणि दीपालीसोबतचा वाद—या सगळ्यामुळे आगामी भाग अधिकच रंजक ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आता या वादाचा पुढचा टप्पा काय असेल आणि घरातील समीकरणं कशी बदलतील, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.









