Veen Doghatli Hi Tutena update : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghatli Hi Tutena प्रेक्षकांमध्ये मोठ्या उत्सुकतेने पाहिली जाते. कथानकातील प्रत्येक पात्राची वेगळी भूमिका आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य यामुळे ही मालिका सातत्याने चर्चेत असते. सध्या या मालिकेत एक धक्कादायक ट्विस्ट येणार असल्याचे समोर आले असून त्याचा परिणाम थेट कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ सदस्यावर होणार असल्याचे दिसत आहे.
मालिकेत स्वानंदी ही शांत, समजूतदार आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी मुलगी म्हणून दाखवली जाते. दुसरीकडे समर हा घरातील माणसांवर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि भावनिक स्वभावाचा आहे. त्याच्यावर आजीचे विशेष प्रेम आहे आणि तिची सतत त्याच्याबद्दल काळजीही दिसून येते. मात्र घरात सगळेच इतके सरळ नाहीत. मल्लिका आणि तिची दोन मुले अर्पिता व अंशुमन यांची महत्त्वाकांक्षा आणि पैशाची लालसा कथानकात वारंवार दिसते. ते समरविरोधात कट रचताना अनेकदा दिसले आहेत.
आता Veen Doghatli Hi Tutena मालिकेच्या आगामी भागात हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये समर एक महत्त्वाचा निर्णय घेताना दिसतो. तो आपल्या वकिलांशी बोलताना घर आणि व्यवसायाची जबाबदारी आजीकडे सोपवण्याचा विचार व्यक्त करतो. समरच्या या निर्णयामागे त्याचा विश्वास आणि आजीबद्दलचा आदर दिसून येतो.
पण हीच गोष्ट अर्पिताच्या कानावर पडते आणि तिथूनच कथानकात मोठा कलाटणी येतो. अर्पिता ही माहिती मल्लिका आणि अंशुमनला सांगते. समरने घेतलेला हा निर्णय ऐकताच मल्लिकाचा संताप अनावर होतो. तिला वाटते की आजीमुळे तिची सर्व योजना उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे ती एक धोकादायक योजना आखते.
प्रोमोमध्ये दाखवले आहे की आजीला दिलेल्या दुधात काहीतरी मिसळले जाते. त्यानंतर आजीला अस्वस्थ वाटू लागते. त्याचवेळी जिन्यावर तेल टाकून आणखी एक सापळा तयार केला जातो. आजी जेव्हा वरच्या मजल्यावरून खाली येत असते, तेव्हा तिचा पाय घसरतो आणि ती पायऱ्यांवरून खाली कोसळते. तिच्या डोक्याला मार लागून ती बेशुद्ध पडते. या सगळ्या प्रकारामागे मल्लिका आणि अर्पिता लपून बसून घडामोडी पाहत असल्याचे दृश्यही प्रोमोमध्ये दिसते.
हे पण वाचा.. मरून साडीत खुलले वैदेही परशुरामीचं मराठमोळं सौंदर्य; पारंपरिक लूकची सोशल मीडियावर चर्चा
इतक्यात स्वानंदी तिथे पोहोचते आणि समरही या घटनेने हादरलेला दिसतो. त्यामुळे आता पुढे कथानक कोणत्या दिशेने जाईल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Veen Doghatli Hi Tutena मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच प्रेक्षकांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत स्वानंदीवर खोटा आरोप येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे. काही प्रेक्षकांनी मालिकेत वारंवार नकारात्मक घटनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे पण वाचा .. होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेता रोहन गुजर होणार बाबा; पत्नी स्नेहलचे मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत
Veen Doghatli Hi Tutena update
आता खरा प्रश्न असा आहे की मल्लिकाने रचलेले हे कारस्थान उघडकीस येणार का? आजीचा जीव वाचणार का? आणि या घटनेचा समर व स्वानंदीच्या नात्यावर काय परिणाम होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागांमध्ये मिळणार असून Veen Doghatli Hi Tutena मालिकेतील आगामी भाग अधिकच थरारक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









