janhavi tambat chiploon shimga post : कोकणात शिमग्याला घराघरांत पोहोचण्याची परंपरा अत्यंत जिव्हाळ्याची आहे. मुंबईतील कोकणवासी दरवर्षी सुट्ट्या घेऊन, आपल्या गावी येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. देवाची पालखी खांद्यावर घेऊन नाचवणे, ओटी भरून पूजा करणे, या सणाशी निगडीत खास परंपरा आहेत, ज्या प्रत्येक कोकणी मनावर खोलवर रुजलेल्या असतात.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मूळचे कोकणातले आहेत. त्यांच्यासाठी शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातूनही वेळ काढून गावी येणे ही एक जाणीव असते. मात्र, यावर्षी ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी तांबट यांना शिमग्याला गावी जाता येत नाही.
जान्हवी तांबट लवकरच ‘कलर्स मराठी’वरील नव्या मालिकेत ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या या मालिकेचे शूटिंग सुरू असल्याने तिला चिपळूणमधील आपल्या गावी शिमग्याचा आनंद घेता आला नाही. तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या भावना मांडल्या आहेत, “जेव्हा संपूर्ण कुटुंब शिमग्याला गावी जातं आणि तुम्हाला जाता येत नाही, तेव्हा थोडं वाईट वाटतं. शिमगा म्हणजे आमच्यासाठी भावना आहे, जी परंपरेशी जोडते आणि बालपणीच्या आठवणी जागृत करते.”
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मध्ये ‘शिवा’ फेम मानसी सुरेशची धमाकेदार एन्ट्री
तिचे चाहते आणि सहकलाकार संचित चौधरी यांनी तिला धीर दिला आहे. संचित म्हणतो, “पुढच्या वर्षी सगळे जाऊ, आता सेटवर मजा करु… डान्ससाठी तयार राहा!” नेटकऱ्यांनीही कमेंट्समध्ये तिला सांत्वन दिले आहे, “शरीराने जरी कोकणात नसलीस तरी मनाने तिथेच धाव घेतली आहे,” असे संदेश त्यांनी दिले आहेत.
janhavi tambat chiploon shimga post
‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून दररोज सायंकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी तांबट आता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे, तर चाहत्यांना तिच्या गावी शिमग्याचा अनुभव पुढच्या वर्षी नक्की घेता येईल अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा.. पांढऱ्या साडीत ‘कमळी’ची होळी; विजया-निखिलची केमिस्ट्री चर्चेत!









