ADVERTISEMENT

Tharala Tar Mag 19 Feb : पैंजणामुळे संशयाची साखळी घट्ट, साक्षीवरच संशय; प्रिया अडचणीत येणार?

Tharala Tar Mag 19 Feb च्या भागात लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदात दडलेला संशय, सुमनला आठवलेला किडनॅपिंगचा क्षण आणि साक्षीभोवती वाढत चाललेली शंका यामुळे कथानकाला नवं वळण मिळालं आहे.
Tharala Tar Mag 19 Feb

Tharala Tar Mag 19 Feb चा भाग प्रेक्षकांसाठी भावनिक आणि थरारक ठरला. सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरात आनंदाचं वातावरण असतं. कुटुंबातील सर्वजण दोघांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा देतात. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांची अदलाबदल केली होती, त्याबद्दल रविराज उत्सुकतेने विचारतो. त्यावर सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या भूमिकेची किंमत ओळखल्याचं स्पष्ट करतात. घरातील काम असो वा बाहेरची जबाबदारी—दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे त्यांनी अनुभवातून शिकल्याचं सायली सांगते.

दुसऱ्या दिवशी सायली पुन्हा किचनमध्ये परतल्याने घरात उत्साह असतो. तिच्या हातच्या जेवणाची चव सगळ्यांना आठवत असते. अर्जुनही ऑफिसला जाण्यापूर्वी घरातल्या वातावरणात रमतो. अस्मिता मुद्दाम त्याला चिडवत असली तरी वातावरण हलकंफुलकंच असतं. अर्जुन सगळ्यांना वाढून देताना कल्पनाही भावूक होते—तिच्या मुलाने घरकाम शिकल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतं. Tharala Tar Mag 19 Feb Episode

दरम्यान, दुसरीकडे कथानकात तणाव वाढू लागतो. सचिनला साक्षीच्या पर्समध्ये सापडलेल्या चाकूबद्दल शंका येते. साक्षी त्याला तो सेल्फ डिफेन्ससाठी असल्याचं सांगते, पण तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा जाणवत नाही. सचिनच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागते. साक्षी मात्र मनात वेगळंच काहीतरी ठरवून बसलेली दिसते.

सायलीला सुमनकडून एक महत्त्वाची माहिती मिळते. प्रतिमाने आणलेलं पैंजण पाहताच सुमनला तिच्या किडनॅपिंगच्या काळातील धूसर आठवणी जाग्या होतात. त्या अवस्थेत तिने एका मुलीच्या पायात असंच पैंजण पाहिलं होतं. चेहरा स्पष्ट दिसला नव्हता, पण पैंजण लक्षात राहिलं होतं. ही गोष्ट ऐकताच सायलीच्या मनात प्रियाबद्दल संशय निर्माण होतो, कारण प्रिया काही दिवसांपासून अगदी तसंच पैंजण घालून वावरताना दिसत आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याच्या कारस्थानामुळे पार्थ-काव्याच्या नात्यात ताण, जीवाने नंदिनीला दिला Gen-Z सल्ला

ही माहिती घेऊन सायली थेट अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते. दोघेही शांतपणे पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतात. प्रिया गाफील राहावी आणि तिच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळावेत, यासाठी आता ‘मिशन प्रिया’ सुरू होतं.
दरम्यान, सचिन अस्मिताशी हल्ल्याच्या रात्रीबद्दल बोलताना साक्षी त्यांच्या संभाषणावर कान देताना दिसते. सचिनच्या मनात ठाम संशय निर्माण होतो की अस्मितावर हल्ला करणारी व्यक्ती साक्षी शिखरेच असू शकते. ओळख बदलली असली तरी तिच्या स्वभावातील आक्रमकता संपलेली नाही, अशी जाणीव त्याला होते. त्यामुळे तो अधिक सावध राहण्याचा निर्णय घेतो. Tharala Tar Mag 19 Feb Full Episode