ADVERTISEMENT

Mi Savitribai Jotirao Phule: जोतीराव-सावित्रीचा ऐतिहासिक विवाह, मालिकेत रंगणार परंपरा, संघर्ष आणि भावनांचा संगम

mi savitribai jotirao phule jotirao savitribai wedding story : स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत लवकरच जोतीराव आणि सावित्रीबाईंचा विवाहसोहळा पाहायला मिळणार असून, त्याआधीच सासरे विरुद्ध जावई अशी नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
mi savitribai jotirao phule jotirao savitribai wedding story

mi savitribai jotirao phule jotirao savitribai wedding story : स्टार प्रवाहवर सुरू असलेली लोकप्रिय मालिका Mi Savitribai Jotirao Phule सध्या प्रेक्षकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. समाजप्रबोधनाचा इतिहास, त्यामागील संघर्ष आणि भावनिक पैलू प्रभावीपणे मांडणारी ही मालिका आता एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या विवाहाचा ऐतिहासिक आणि भावस्पर्शी प्रसंग दाखवला जाणार आहे. हा सोहळा केवळ एका कथानकापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाशी जोडलेला असल्याने प्रेक्षकांसाठी तो खास ठरणार आहे.

या विवाहसोहळ्याची मांडणी काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे. त्या काळातील परंपरा, संस्कृती आणि सामाजिक रितीरिवाज यांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक प्रसंग साकारण्यात आला आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याची प्रथा असो, मुहूर्तमेढ रोवण्याचा विधी असो किंवा हळदी-चुडा यांसारखे मंगल क्षण – हे सर्व प्रसंग मालिकेत भावपूर्ण आणि वास्तवदर्शी पद्धतीने दाखवले जाणार आहेत. सावित्रीबाईंच्या साडी, दागिने आणि संपूर्ण लग्नसोहळ्यामागील सांस्कृतिक अर्थ प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाणारा ठरणार आहे.

मात्र या मंगल क्षणांआधीच कथानकात नाट्यमय वळण आले आहे. मालिकेत क्रांतीकारी तात्या टोपे यांची एंट्री झाल्याने गोष्टींना वेगळाच रंग मिळाला आहे. गावात हेरगिरी करताना तात्या टोपेंना लहान जोतीरावांची चुणूक दिसते आणि त्यांना पुढील ध्येयासाठी सोबत घेण्याचा निर्णय घेतला जातो. त्याच दरम्यान, सरकारी खजिना पळवण्याचा एक धाडसी कट आखला जातो, जो लग्नाच्या आदल्या रात्री अंमलात आणायचा असतो.

इथेच कथेत मोठा ट्विस्ट निर्माण होतो. ज्या पाटलाच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने हा कट रचला जातो, त्याच मुलीचा विवाह जोतीरावांसोबत ठरलेला असतो, याची माहिती कट रचणाऱ्यांना नसते. दुसरीकडे, सरकारी खजिन्याच्या सुरक्षेची जबाबदारी सावित्रीबाईंच्या वडिलांवर असल्याने सासरे विरुद्ध जावई अशी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. अशा तणावपूर्ण पार्श्वभूमीवर हा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडणार का, की इतिहासाला वेगळे वळण मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag: कोर्टात अर्जुनची कोंडी, महिपतची पलटी; नागराजला बेल मिळण्याची दाट शक्यता

Mi Savitribai Jotirao Phule ही मालिका दररोज सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होत असून, येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा, संघर्षाचा आणि इतिहासाचा अनोखा अनुभव देणार आहे.

हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम प्रोमोमध्ये भावनिक वळण; गैरसमज दूर होणार, नात्यांना नवी दिशा