lakshmi niwas dhanashree patil sinchana entry : झी मराठीवरील गाजलेली कौटुंबिक मालिका ‘लक्ष्मी निवास’ गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दररोज एक तास प्रसारित होणाऱ्या या मालिकेने अल्पावधीतच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कथानकातील नातेसंबंध, भावनिक गुंतवणूक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका सातत्याने चर्चेत असते. अशातच आता ‘लक्ष्मी निवास’मधून एका महत्त्वाच्या अभिनेत्रीची एक्झिट आणि नव्या अभिनेत्रीची एन्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
या मालिकेत सिद्धूची सख्खी बहीण आणि लक्ष्मीची धाकटी सून अशी दुहेरी छाप सोडणारी सिंचना ही भूमिका अभिनेत्री तन्वी कोलते साकारत होती. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे सिंचनाचं पात्र प्रेक्षकांना भावलं होतं. मात्र, तन्वी कोलतेने नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात प्रवेश केल्यामुळे तिला ‘लक्ष्मी निवास’ला अलविदा करावा लागला. ‘बिग बॉस’चा प्रवास दीर्घकालीन असल्याने, शोमध्ये जाण्यापूर्वीच तिने मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.
तन्वीच्या एक्झिटनंतर सिंचनाची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Dhanashree Patil हिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. Dhanashree Patil हिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या प्रवासाची माहिती दिली. सिंचनाच्या लूकमधील फोटो शेअर करत तिने प्रेक्षकांना संदेश दिला की, “सिंचना तुम्हाला भेटायला येत आहे ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’मध्ये. या नव्या प्रवासात तुमची साथ आणि प्रेम मला हवं आहे.”
Dhanashree Patil हिच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. मेकअप रूममधील फोटो, सेटवरील क्षण आणि तिचा नवा अवतार पाहून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेली Dhanashree Patil आता छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडणार, अशी अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा.. मी मोठ्याने हसते, म्हणून काय? तारिणी फेम शिवानी सोनार हिने मोकळेपणाने सांगितला तिचा अनुभव
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत झी मराठीवर प्रसारित केली जाते. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, मेघन जाधव आणि दिव्या पुगावकर यांसारख्या कलाकारांच्या दमदार भूमिका या मालिकेचा मजबूत आधार आहेत. आता सिंचनाच्या भूमिकेत Dhanashree Patil कशी रंग भरते, आणि प्रेक्षक तिच्या अभिनयाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. ज्वारीची भाकरी ते सायकलिंगपर्यंत – दीपाली पानसरेचा साधा आणि प्रभावी वेट लॉस फॉर्म्युला









