bigg boss marathi 6 captaincy task friendship clash : बिग बॉस मराठी ६ च्या घरात नवव्या दिवशी पार पडणाऱ्या कॅप्टन्सी कार्याने वातावरण चांगलंच तापवलं आहे. या कार्यात स्पर्धकांसमोर दोन वेगवेगळी दारं ठेवण्यात आली आहेत. एक दार शेणाचं तर दुसरं मेणाचं. या दारांमधून कोण जाणार, कोणाला कॅप्टन्सीची उमेदवारी मिळणार आणि कोणाच्या नात्यांना तडे जाणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.
या कॅप्टन्सी कार्यासाठी घरात तीन-तीन स्पर्धकांची त्रिकुटं तयार करण्यात आली आहेत. पहिल्या गटात दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे. या त्रिकुटात दिव्या कॅप्टन होण्यास पात्र नाही, असा थेट आरोप अनुश्री माने करते. मात्र, दिव्या शांत बसत नाही आणि ती अनुश्रीला जोरदार प्रत्युत्तर देत स्वतःची बाजू ठामपणे मांडते. त्यामुळे सुरुवातीलाच कार्यात वादाला तोंड फुटतं.
दुसऱ्या गटात सागर कारंडे, रोशन भजनकर आणि अनुश्री माने आहेत. तर तिसऱ्या त्रिकुटात रुचिता जामदार, आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांच्यात कॅप्टन्सीची चुरस पाहायला मिळते. मात्र, इथेच एक अनपेक्षित वळण येतं. रुचिताच्या विरोधात तिच्याच जवळच्या मैत्रिणी अनुश्री आणि राधा उभ्या राहतात आणि तिला थेट शेणाच्या घरात पाठवतात.
या निर्णयामुळे रुचिता प्रचंड संतापते. आपण ज्यांना मित्र मानत होतो, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्याची भावना ती उघडपणे व्यक्त करते. “यापुढे या माझ्या मैत्रिणी नाहीत,” असं ती सर्वांसमोर सांगते. इतकंच नाही तर शेणाच्या घरात गेल्यानंतर रागाच्या भरात ती तन्वी कोलतेलाही कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढते. आता मला कोणालाच सपोर्ट करायचा नाही, असं ठाम मत रुचिता मांडते.
रुचिताच्या या निर्णयाचा थेट फटका तन्वीला बसतो आणि तिला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागतं. आता तन्वी यावर काय प्रतिक्रिया देणार, ती रुचिताला प्रत्युत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, या सगळ्या गोंधळाचा फायदा आयुष संजीवला होणार का, आणि तो ही संधी आपल्या बाजूने वळवणार का, याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान, Bigg Boss Marathi 6 च्या या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी “लोकल गँग”, “मैत्री केवळ गेमपुरती”, “अनुश्रीकडून निगेटिव्ह vibes”, “आता आयुष कॅप्टन व्हायला हवा” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी तर रुचिताला घराबाहेर काढण्याची मागणीही केली आहे.
हे पण वाचा.. अश्विनी महांगडेची ‘माया’ भूमिका: सोज्वळ अनघानंतर का स्वीकारले कपटी मायाचे पात्र?
एकंदरीत, Bigg Boss Marathi 6 मधील ही कॅप्टन्सी टास्क केवळ खेळापुरती न राहता नात्यांची खरी परीक्षा ठरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आजचा भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच थरारक ठरणार आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाह च्या लोकप्रिय नायकाच्या घरी आनंदाची बातमी, अभिनेता आकाश नलावडे झाला बाबा







