ADVERTISEMENT

Milind Gawali Deepa Gawali Love Story: नवस, पत्रं आणि पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट

Milind Gawali Deepa Gawali Love Story : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांच्या पत्नी दीपा गवळी यांची प्रेमकहाणी केवळ रोमँटिक नाही, तर जबाबदारी, संयम आणि नात्यांवरील विश्वासाची आहे.
Milind Gawali Deepa Gawali Love Story

Milind Gawali Deepa Gawali Love Story : मराठी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते Milind Gawali आजही विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अभिनयाच्या या दीर्घ प्रवासात त्यांच्या आयुष्यात कायम सोबत राहिल्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी दीपा गवळी. अनेकांना वाटतं की कलाकारांची प्रेमकहाणी झटपट घडते, पण Milind Gawali आणि दीपा यांची कथा मात्र संयम, प्रतीक्षा आणि जबाबदारीनं भरलेली आहे.

लग्नाआधीच दोघांची ओळख झाली होती. एका मुलाखतीत Milind Gawali यांनी त्यांच्या आयुष्यातील हा खास टप्पा अतिशय प्रामाणिकपणे उलगडून दाखवला आहे. स्वतःबद्दल बोलताना ते म्हणतात की, ते लहानपणी फारसे शिस्तबद्ध नव्हते. शिक्षणात विशेष गती नाही, भविष्यात काय होणार याबद्दल घरच्यांनाही चिंता होती. आई आणि बहिणीनं त्यांच्या शिक्षणासाठी देवाला नवस केले होते. दहावी पास व्हावी यासाठी बहिणीनं शेगावला नवस केला होता आणि योगायोगानं ते पास झाले.

याच काळात जळगावला एका लग्नासाठी गेले असताना आयुष्यातील वळण आलं. एसटीतून उतरतानाच लाल रंगाचा ड्रेस घातलेली, लांब केसांची एक मुलगी त्यांच्या नजरेत भरली आणि ते क्षणात प्रेमात पडले. तोच ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’चा अनुभव होता. त्या वेळी Milind Gawali केवळ १५ वर्षांचे होते. त्यांनी आईकडे मनातली इच्छा व्यक्त केली आणि आश्चर्य म्हणजे घरच्यांनीही या नात्याला विरोध केला नाही.

दीपाच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे तिच्या आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीतही दीपाच्या आईनं परिपक्वतेनं निर्णय घेत Milind Gawali यांना पत्र लिहिलं. आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि दीपाच्या लग्नाचा विचार तेव्हाच करू, असं त्या पत्रात नमूद होतं. हे शब्द Milind Gawali यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यांनी अभ्यासाला गांभीर्यानं सुरुवात केली, मेहनत घेतली आणि पुढे बी.कॉम., एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

या संपूर्ण काळात दोघांमध्ये केवळ पत्रव्यवहार आणि फोनवरच संवाद होत होता. प्रत्यक्ष भेटी फारशा नव्हत्या. अखेर लग्न झालं, पण सुरुवातीचे सहा महिने खूप कठीण गेले. प्रत्यक्ष एकत्र राहिल्यावर गैरसमज झाले, वादही झाले. मात्र मित्रांच्या मदतीनं संवाद साधला गेला आणि नात्याला नवी दिशा मिळाली.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये भीषण वळण! अंशुमनच्या कटामुळे रोहनचा अपघात, स्वानंदीवर मोठं संकट

आज Milind Gawali आणि दीपा गवळी यांच्या लग्नाला ४० हून अधिक वर्षं पूर्ण झाली आहेत. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यावर उभं असलेलं हे नातं आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. कमळी–लक्ष्मी निवास महासंगमात मोठा ट्विस्ट, कामिनी–अनिकाला मिळाली शिक्ष