tejashri pradhan new look veen doghantali hi tutena : मराठी टेलिव्हिजन विश्वात सहज, नैसर्गिक अभिनय आणि साध्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री Tejashri Pradhan ही प्रेक्षकांची कायमची लाडकी आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून सध्या ती ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये स्वानंदी ही भूमिका साकारताना दिसतेय. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
स्वानंदी हे पात्र स्वभावाने अत्यंत साधं, कुटुंबवत्सल आणि सुसंस्कृत दाखवण्यात आलं आहे. घर, नातेसंबंध आणि मूल्ये जपणारी स्वानंदी मालिकेत सतत मल्लिकाच्या कारस्थानांना सामोरी जातेय. आगामी भागांमध्ये स्वानंदी मल्लिकाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार असल्याचं संकेत मिळत असल्यामुळे कथानक आणखी रंजक वळणावर पोहोचलं आहे. या पात्राच्या स्वभावाशी सुसंगत असा लूक Tejashri Pradhan ने ऑनस्क्रीन कायम जपला आहे.
समरशी लग्न होण्याआधी स्वानंदी साध्या ड्रेस-ओढणीत, कपाळावर छोटी टिकली, हातात घड्याळ आणि साधी कडा अशा लूकमध्ये दिसायची. तर राजवाडे कुटुंबाची सून झाल्यानंतर ती साडीतील पारंपरिक अवतारात प्रेक्षकांसमोर येतेय. विशेष म्हणजे, अनेक कलाकार पडद्यावर साधे दिसत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात ग्लॅमरस असतात. मात्र Tejashri Pradhan ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही ठिकाणी आजवर जवळपास एकाच लूकमध्ये दिसत होती.
मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्यांदाच तिने ऑफस्क्रीन नेहमीपेक्षा वेगळा आणि थोडासा हटके लूक स्वीकारला आहे. तिच्या नव्या हेअरस्टाईलमुळे तिचा चेहरा अधिक खुलून दिसत असून हा बदल चाहत्यांना विशेष भावला आहे. या नव्या लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत, “एका वेगळ्या हेअरकटमधून मी नवा दृष्टीकोन शोधण्याचा प्रयत्न करतेय” असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत प्रेमाचा वर्षाव केला आहे. “नॅचरल ब्युटी”, “वॉव न्यू लूक”, “खूपच गोड दिसतेस”, “सिंपल असूनही किती सुंदर” अशा अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. Tejashri Pradhan चा हा बदललेला अंदाज प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये पॉवर Key मुळे तिसऱ्या दिवशी मोठा गोंधळ, रुचिताचं स्वप्न धोक्यात?
दरम्यान, Tejashri Pradhan प्रमुख भूमिकेत असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित होते. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावेही महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. अभिनयासोबतच व्यक्तिमत्त्वातील बदलामुळेही तेजश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हे पण वाचा.. वडिलांच्या आठवणीत भावूक झाली प्रार्थना बेहेरे; “हा सिनेमा मी बाबांसाठीच केला”







