bigg boss marathi 6 tanvi kolte entry : बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येताच चर्चांना उधाण आलं आहे. भव्यदिव्य ग्रँड प्रीमियरसोहळ्याने या पर्वाची दमदार सुरुवात झाली असून पुढचे १०० दिवस हा शो रोज रात्री आठ वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात एकूण १७ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. मात्र, यामधून छोट्या पडद्यावरील ‘कूल सूनबाई’ म्हणून ओळख मिळवलेल्या Tanvi Kolte हिने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मुळे Tanvi Kolte घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने सिंचना ही भूमिका साकारली होती. सिद्धूची धाकटी बहीण आणि लक्ष्मी-श्रीनिवास यांची लाडकी सून म्हणून तिचं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं. मात्र, अचानक Tanvi Kolte ने ही मालिका सोडून ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला. आता शो संपल्यानंतर ती पुन्हा मालिकेत दिसणार की, सिंचनच्या भूमिकेसाठी नवी अभिनेत्री येणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ग्रँड प्रीमियरमध्ये Tanvi Kolte आणि आयुष संजीव यांनी सादर केलेल्या डान्स परफॉर्मन्सने वातावरणच बदलून टाकलं. स्टेजवर येताच Tanvi Kolte ने आपला उत्साह लपवला नाही. रितेश देशमुखसमोर उभी राहून तिने व्यक्त केलेला आनंद प्रेक्षकांना भावून गेला. हा क्षण तिच्यासाठी स्वप्नपूर्तीचा असल्याचं तिच्या शब्दांतून स्पष्ट दिसत होतं.
मुंबईत येताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या Tanvi Kolte साठी ‘बिग बॉस मराठी’ हे स्वतःला सिद्ध करण्याचं मोठं व्यासपीठ आहे. घरात प्रवेश करण्याआधी रितेश देशमुखने तिला दोन पर्याय दिले होते. एक ‘शॉर्टकट दार’, ज्यातून एन्ट्री घेतल्यास ‘पॉवर की’ मिळणार होती, तर दुसरं मेहनतीचं दार. थोड्याशा विचारानंतर Tanvi Kolte ने शॉर्टकट दार निवडलं, ज्यामुळे तिच्या खेळाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
हे पण वाचा.. शिव ठाकरे विवाहबंधनात; अचानक शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का
‘लक्ष्मी निवास’मधील समजूतदार आणि शांत सिंचना आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कशी वागणार, ती कोणती स्ट्रॅटेजी वापरणार आणि इतर स्पर्धकांशी तिचे संबंध कसे राहणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. Tanvi Kolte चा हा नवा प्रवास तिच्या करिअरला कोणती दिशा देतो, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. लग्नबंधनात अडकणार विशाल निकम? ‘माझी सौंदर्या…’ पोस्टमुळे चर्चांना उधाण









