bhagyashree dalvi savalyachi janu savli dance video : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Savalyachi Janu Savali सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली असून कथानकही भावनिक आणि सामाजिक मुद्द्यांना स्पर्श करणारे आहे. मालिकेची गोष्ट मुख्यत्वे सारंग आणि सावली यांच्या आयुष्याभोवती फिरते. गैरसमज, फसवणूक आणि परिस्थितीच्या खेळामुळे सावलीला मेहेंदळे कुटुंबात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिच्या संयमी स्वभावामुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिने हळूहळू सगळ्यांची मनं जिंकली.
सारंगच्या आयुष्यात सावलीचं आगमन जगन्नाथमुळे झालं. सुरुवातीला तिच्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हतं. गरीब पार्श्वभूमी आणि सावळा रंग यामुळे तिला अपमान सहन करावा लागला. तिलोत्तमा आणि ऐश्वर्या यांनी तर तिला घराबाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण या सगळ्यावर मात करत सावलीने आपली जागा निर्माण केली. कालांतराने सारंगलाही समजतं की सावलीची यात काहीच चूक नाही. त्यामुळे तो तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि तिचं संरक्षण करतो.
या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचं गुपित आहे, ते म्हणजे सावलीचं गाणं. ती तारासाठी गाते, ही गोष्ट अजूनही संपूर्ण कुटुंबापासून लपलेली आहे. तारा ही भैरवी वझेची मुलगी असून तिच्यावर गाण्याची परंपरा पुढे नेण्याचा दबाव आहे. मात्र, ताराला गायनात रस नसून अभिनयाची आवड आहे. त्यामुळे गाणं सावली गाते आणि तारा गाते असल्याचं नाटक केलं जातं.
तारा ही भूमिका अभिनेत्री Bhagyashree Dalvi साकारत आहे. मालिकेत गंभीर भूमिका निभावणारी Bhagyashree Dalvi प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच उत्साही आणि टॅलेंटेड असल्याचं तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून दाखवून दिलं आहे. Bhagyashree Dalvi हिने सोशल मीडियावर सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटातील ‘बुलैया’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या एनर्जीपूर्ण डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
या व्हिडीओवर चाहत्यांनी “अप्रतिम”, “कमाल”, “खूप सुंदर” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर ताराच्या भूमिकेवरून विनोदी कमेंट्सही केल्या आहेत. विशेष म्हणजे मालिकेत तिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघा धाडे यांनीही हार्ट इमोजी शेअर करत Bhagyashree Dalvi चं कौतुक केलं आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6: घरात होणार ‘सुपर मॉडेल’ची ग्रँड एन्ट्री, कोण आहे ती?
दरम्यान, Savalyachi Janu Savali मालिकेतील पुढील वळण काय असणार, सावलीचं गुपित कधी उघड होणार आणि ताराचं सत्य समोर येणार का, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहची ‘काजळमाया’ ठरली अल्पायुषी, अवघ्या दोन महिन्यांत मालिका ऑफ एअर होणार









