ADVERTISEMENT

वल्लरी विराजचं दमदार कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ कधी आणि किती वाजता पाहायला मिळणार?

zee marathi shubh shravani new serial launch : झी मराठी वरील आगामी मालिका Shubh Shravani १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वल्लरी विराज आणि सुमित विजय यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
zee marathi shubh shravani new serial launch

zee marathi shubh shravani new serial launch : झी मराठी ने आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक नवी कथा घेऊन येण्याची तयारी पूर्ण केली आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या Shubh Shravani या नव्या मालिकेची ऑनएअर तारीख आणि वेळ अखेर अधिकृतरित्या समोर आली आहे. या मालिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमधील तिच्या भूमिकेमुळे वल्लरी घराघरात पोहोचली होती. आता ती ‘लीला’ची ओळख मागे ठेवून ‘श्रावणी’च्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Shubh Shravani या मालिकेत वल्लरीसोबत अभिनेता सुमित विजय प्रमुख पुरुष भूमिका साकारताना दिसणार आहे. सुमितने याआधी काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून आपली छाप सोडली असून, मालिकेच्या माध्यमातून तो टीव्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या दोघांची फ्रेश जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याशिवाय या मालिकेचं आणखी एक खास आकर्षण म्हणजे अभिनेते लोकेश गुप्ते यांचा छोट्या पडद्यावर होणारा कमबॅक. जवळपास नऊ वर्षांनंतर ते पुन्हा मालिकेत दिसणार असून, ते श्रावणीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. ‘वादळवाट’, ‘लज्जा’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

या कलाकारांव्यतिरिक्त Shubh Shravani मालिकेत आसावरी जोशी, जुई तनपुरे आणि कोमल शेटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून मालिकेच्या कथेची झलक दाखवण्यात आली आहे. श्रावणी ही अभ्यासात हुशार, स्वाभिमानी मुलगी असून तिचं वडिलांशी नातं तणावपूर्ण असल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. परीक्षेच्या दिवशी वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती पुढे जाते, पण त्यांच्या कठोर शब्दांमुळे ती मागे फिरते. अशा कठीण क्षणी मालिकेचा नायक तिला हुशारीने धीर देतो आणि तिच्या हातात वडिलांचं पेन देत आत्मविश्वास वाढवतो. हीच भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट प्रेक्षकांना भावणार असल्याचं दिसत आहे.

हे पण वाचा.. तुझ्या सोबतीने’मालिकेची तारीख बदलली! स्टार प्रवाहवर नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी कथा

Zee Marathi ने दिलेल्या माहितीनुसार Shubh Shravani ही मालिका १९ जानेवारीपासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या वेळेत दाखवली जाणारी ‘पारू’ मालिका बंद होणार की तिच्या वेळेत बदल होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, नव्या मालिकेच्या प्रोमोला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता Shubh Shravani बद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा.. माझेही जवळपास ३ लाख रुपये थकीत… विदिशा म्हसकर यांनी मंदार देवस्थळींबाबत स्पष्ट भूमिका मांडली

zee marathi shubh shravani new serial launch