bigg boss marathi 6 sagar karande rumours : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या पर्वासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा रिअॅलिटी शो कोणकोणत्या चेहऱ्यांना घेऊन येणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर संभाव्य स्पर्धकांची नावं चर्चेत असून, अनेक कलाकारांबाबत अंदाज बांधले जात आहेत. अशातच आता एक नाव जोरात पुढे येत आहे आणि ते म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता Sagar Karande.
सागर कारंडेने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. “गंमत झाली आता *** – जंमत होणार. लवकरच तुमच्या भेटीला,” असं सूचक कॅप्शन त्याने या पोस्टसोबत लिहिलं आहे. विशेष म्हणजे, या पोस्टला “लवकरच तुमच्या भेटीला २०२६” असंही नमूद करण्यात आलं आहे. या ओळी वाचल्यानंतर चाहत्यांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकांचा अंदाज आहे की Sagar Karande लवकरच Bigg Boss Marathi 6 च्या घरात प्रवेश करू शकतो.
सागर कारंडे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधील त्याच्या भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात गेला, तर शोमध्ये मनोरंजनाचा स्तर नक्कीच वाढेल, असं चाहत्यांना वाटत आहे. मात्र, सध्या सागरचं ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक रंगभूमीवर सुरू असल्याने, त्याची ही पोस्ट नाटकासंदर्भात आहे की Bigg Boss Marathi 6 संदर्भात, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सध्या तरी या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, Bigg Boss Marathi 6 या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. रितेशभाऊ आपल्या खास शैलीत ‘भाऊचा धक्का’ देताना आणि घरातील स्पर्धकांचे मुखवटे उतरवताना दिसणार आहे. यंदाच्या सीझनची थीमही वेगळी आणि रंजक असणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या ११ जानेवारीपासून हा बहुचर्चित शो सुरू होणार असून, कलर्स मराठीवर दररोज रात्री ८ वाजता प्रेक्षकांना Bigg Boss Marathi 6 पाहता येणार आहे.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag : भर रस्त्यात सचिनचे चाळे, अस्मिता कोसळली; घरात वादळ
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की Sagar Karande खरंच बिग बॉसच्या घरात जाणार का? याचं उत्तर लवकरच समोर येणार असून, तोपर्यंत चाहत्यांची उत्सुकता कायम राहणार आहे.
हे पण वाचा.. प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरा केला वर्षाचा शेवट; चुलीवरचं जेवण, डान्स आणि आठवणींनी भरलेला ३१ डिसेंबर









