ADVERTISEMENT

८ वर्षांनंतर पुन्हा सासू-सुनेची केमिस्ट्री; ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत स्टार प्रवाहची ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार

Tuzya Sobatine new Star Pravah serial time and cast : तुज्या सोबतीने ही नवी मराठी मालिका १२ जानेवारीपासून स्टार प्रवाहवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार असून दमदार कलाकारांमुळे मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Tuzya Sobatine new Star Pravah serial time and cast

Tuzya Sobatine new Star Pravah serial time and cast : स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या वर्षात आणखी एक भावनिक आणि नात्यांची गुंफण उलगडणारी मालिका दाखल होणार आहे. Tuzya Sobatine असं या नव्या मालिकेचं नाव असून १२ जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका नेमकी कोणत्या वेळेला प्रसारित होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर वाहिनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून Tuzya Sobatine ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

या मालिकेत अभिनेत्री एतशा संझगिरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एतशाने याआधी स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली होती. विशेष बाब म्हणजे, त्या मालिकेत तिच्या सासूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा नायक आता जवळपास आठ वर्षांनंतर पुन्हा एतशासोबत झळकणार आहे. Tuzya Sobatine मध्येही या दोघी सासू-सुनेच्या नात्यात प्रेक्षकांसमोर येणार असल्याने या जोडीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

मालिकेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतील दोन ओळखीचे चेहरेही दिसणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राची आवडती खलनायिका म्हणून ओळखली जाणारी माधवी निमकर पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिच्यासोबतच देवकीच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री भक्ती रत्नपारखीही या मालिकेत दिसणार असून ती नायिकेच्या वहिनीची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पूजा नायक आणि भक्ती रत्नपारखी यांची झलक पाहायला मिळाली आहे.

Tuzya Sobatine चा हिरो म्हणून लोकप्रिय अभिनेता अजिंक्य ननावरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अजिंक्य या नव्या भूमिकेत काय वेगळं सादर करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मालिकेच्या कथानकात नुपूर आणि तिच्या सासूबाईंमधील नातं अतिशय हळुवार पद्धतीने मांडलेलं दिसतं. औषधांची काळजी, घरातले साधे क्षण, तिळगुळाचे लाडू आणि मनापासून दिलेली साथ हे सगळं कथेत भावनिक रंग भरतं. “काहीही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही,” असा संवाद प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतो. पुढे नुपूर आणि मल्हार यांची पहिली भेटही मजेशीर वळण घेते, ज्यामुळे कथेला नवा आयाम मिळतो.

हे पण वाचा.. २०२५ ने मला खूप काही शिकवलं’ – जुई गडकरीची भावनिक पोस्ट चर्चेत

एकूणच, Tuzya Sobatine ही मालिका नात्यांमधील विश्वास, सोबत आणि भावनिक बांधिलकी यांवर आधारलेली असल्याचं दिसतं. १२ जानेवारीपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. महिपतचा ठावठिकाणा सापडला! ठरलं तर मग च्या नव्या प्रोमोमध्ये सुमनचा धाडसी डाव, नागराजचं सत्य उघड होणार का?

Tuzya Sobatine new Star Pravah serial time and cast