ashwini mahangade archana patkar support : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका संवेदनशील प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. अभिनेत्री हेमलता बाणे पाटकर हिला २९ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली. गोरेगावमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अमरीना मॅथ्यू फर्नांडिस हिलाही अटक करण्यात आली असून तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत.
या अटकेनंतर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांचं नाव अचानक चर्चेत आलं. कारण हेमलता या अर्चना पाटकर यांची सून असल्याचं समोर आलं. मात्र, वाढत्या चर्चेनंतर अर्चना पाटकर यांनी सोशल मीडियावर स्पष्ट भूमिका मांडत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता हे चार वर्षांपूर्वीच विभक्त झाले असून सध्या घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाशी किंवा हेमलताशी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही.
अर्चना पाटकर यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतरही सोशल मीडियावर त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरूच होत्या. अशा कठीण काळात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतीलच त्यांची सहकलाकार अभिनेत्री Ashwini Mahangade हिनं त्यांना जाहीर पाठिंबा दिला. अश्विनी महांगडे हिनं अर्चना पाटकर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत अत्यंत भावनिक शब्दांत त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त केली.
Ashwini Mahangade हिनं पोस्टमध्ये अर्चना पाटकर यांचं केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही कौतुक केलं. त्या पोस्टमध्ये अर्चनाला प्रेमळ, आधार देणारी, संस्कार घडवणारी आणि सतत पुढे जाण्यास प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून वर्णन करण्यात आलं. “ती हात देते, कुशीत घेते आणि नकळत आपल्याला उभं करते,” अशा शब्दांत अश्विनीने अर्चनाबद्दलचं नातं मांडलं.
दरम्यान, अर्चना पाटकर यांनीही आपल्या पोस्टमध्ये मीडियाला आवाहन करत नाव आणि फोटोचा गैरवापर करू नये, अशी विनंती केली आहे. गेली चार दशके प्रामाणिकपणे काम करत असताना अचानक अशा वादात नाव ओढलं जाणं वेदनादायक असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं.
हे पण वाचा.. भावाच्या लग्नात रितिका श्रोत्रीची धमाल, संगीत सोहळ्यात ‘डोला रे डोला’वर झक्कास डान्स
या संपूर्ण प्रकरणात Ashwini Mahangade हिनं दिलेला पाठिंबा केवळ मैत्रीचा नाही, तर सहकलाकारांमधील घट्ट नात्याचं उदाहरण ठरत आहे. मनोरंजन विश्वातील या घडामोडींकडे सध्या प्रेक्षक आणि चाहते बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
हे पण वाचा.. कृतज्ञतेचा भावूक व्हिडीओ शेअर करत संकर्षण कर्हाडे म्हणतोय – प्रेक्षकांचं प्रेमच माझी खरी कमाई









