ADVERTISEMENT

सेटवरील पहिली भेटीतील भांडण ते हटके प्रपोजल: श्वेता शिंदेची खास प्रेमकहाणी

shweta shinde love story sandeep bhansali : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे यांनी पती संदीप भन्साळी यांच्यासोबतच्या प्रेमकहाणीचे रंजक किस्से शेअर केले. पहिल्या भेटीतील वादापासून ते अनोख्या प्रपोजलपर्यंतचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरतो.
shweta shinde love story sandeep bhansali

shweta shinde love story sandeep bhansali : मराठी टेलिव्हिजन विश्वात यशस्वी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Shweta Shinde यांनी अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. छोट्या पडद्यावर प्रेमकहाण्या रंगवणाऱ्या श्वेता शिंदेंची स्वतःची प्रेमकहाणी मात्र तितकीच रंजक आणि वेगळी आहे. नुकतीच त्यांनी झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये हजेरी लावली. या खास भागात श्वेता यांच्यासोबत त्यांचे पती संदीप भन्साळीही उपस्थित होते. दोघांनीही आपल्या नात्याच्या सुरुवातीच्या आठवणी, किस्से आणि प्रेमप्रवास मनमोकळेपणाने शेअर केला.

कार्यक्रमादरम्यान संदीप भन्साळी यांनी श्वेता शिंदे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. २००५ साली एका प्रोडक्शन हाऊससाठी पायलट एपिसोडचं शूटिंग सुरू होतं. त्याचवेळी एका कलाकाराच्या अनुपस्थितीमुळे अचानक संदीप यांना कामासाठी बोलावण्यात आलं. लिफ्टमधील एका सीनदरम्यान सर्वांशी ओळख करून घेत असताना त्यांनी श्वेताला ‘हाय’ म्हटलं. मात्र त्यावर श्वेतांची प्रतिक्रिया काहीशी तिखट होती. “तुला कोणी मिळालं नाही म्हणून निवड झाली, तू हे डिजर्व करत नाहीस,” असं तिने थेट सांगितलं. यामुळे पहिल्याच भेटीत दोघांमध्ये वाद झाला आणि शूटिंग थांबवावं लागेल इतकं भांडण झालं.

या घटनेवर श्वेता शिंदेही हसत प्रतिक्रिया देतात. त्या म्हणाल्या की वाद इतका वाढला होता की आपण संदीप यांच्यावर धावून गेलो होतो. या भांडणामुळे शूटिंग काही काळ थांबलं होतं. विशेष म्हणजे काही वर्षांनंतर जेव्हा दोघांचं लग्न झालं, तेव्हा याच प्रोजेक्टशी संबंधित दिग्दर्शक-निर्माते लग्नात आले आणि “हेच करायचं होतं तर आमची का फजिती केली,” असं गंमतीशीरपणे म्हणाले.

नंतरच्या काळात दोघांमधील ओळख हळूहळू प्रेमात बदलली. संदीप भन्साळी यांनी श्वेता शिंदेंना दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावाची गोष्ट तर अधिकच खास आहे. डेटिंगदरम्यान एका रेस्टॉरंटमध्ये सी-फूड ऑर्डर केल्यानंतर, खेकड्याची नांगी हातात धरून त्यांनी श्वेतांना लग्नासाठी विचारलं. त्यावर थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ न म्हणता, “आयुष्यभर असंच खाऊ घालशील का?” असा प्रश्न श्वेतांनी विचारला आणि संदीप यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘हो’ म्हटलं.

हे पण वाचा.. माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून वेगळा आहे…हेमलता बाणे खंडणी प्रकरणावर अर्चना पाटकर यांचा ठाम खुलासा, ‘आमच्याशी कोणताही संबंध नाही’

आज Shweta Shinde आणि संदीप भन्साळी यांना लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना वामिका नावाची १४ वर्षांची मुलगी आहे. पहिल्या भेटीतल्या भांडणापासून प्रेमळ कुटुंबापर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. अमेय नारकरसोबत डेटवर अभिनेत्री ईशा संजय, रोमँटिक फोटो व्हायरल

shweta shinde love story sandeep bhansali