vachan dile tu mala first episode update : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणारी वचन दिले तू मला ही नवी मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये याविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे प्रमुख भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत मिलिंद गवळी, इंद्रनील कामत, किरण ढाणे यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत.
या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना थरारक आणि भावनिक असा अनुभव मिळणार आहे. प्रोमोमध्ये ऊर्जा ही वकील एका पीडित मुलीसाठी पोलिस ठाण्यात जाते आणि न्याय मिळवण्याची लढाई लढताना दिसते. पोलिस तिची तक्रार घेण्यास नकार देतात, पण ऊर्जा हुशारीने अशी युक्ती लावते की अखेर तक्रार नोंदवली जाते. या सीनमधून मालिकेच्या कथा आणि ऊर्जाच्या धाडसी व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो.
मुख्य अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने स्वतः या मालिकेच्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंगबाबत काही खास तपशील शेअर केले आहेत. स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “आज आम्ही Vachan Dile Tu Mala या मालिकेच्या पहिल्या एपिसोडचं शूटिंग करत आहोत आणि पहिल्याच भागात फाईट सिक्वेन्स आहे.” ती पुढे सांगते की हा सीन खूप मेहनतीनं आणि जोशात शूट करण्यात आला असून, प्रेक्षकांना पहिल्याच एपिसोडमध्ये दमदार ड्रामा पाहायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये अनुष्का वकिलाच्या भूमिकेत सजताना आणि सेटवरील फाईट सीन दाखवतानाही दिसते. त्या सीनमध्ये दुर्गामातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या घटनेचं शूटिंग सुरू असल्याचं दिसतं. अनुष्काच्या चेहऱ्यावरची उर्जा आणि आत्मविश्वास पाहूनच तिच्या भूमिकेची ताकद जाणवते.
Vachan Dile Tu Mala ही मालिका १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज रात्री साडे नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार असून, पहिल्याच एपिसोडमधील फाईट सीन आणि कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा अंदाज आहे.
हे पण वाचा.. फक्त १५ एपिसोडनंतर Off-Air! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा अंतिम भाग जाहीर; ईशाच्या Exit मुळे प्रेक्षक संतापले
अनुष्का सरकटे याआधी ३६ गुणी जोडी, कारभारी लयभारी आणि श्री लक्ष्मी नारायण या मालिकांमधून आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता Vachan Dile Tu Mala मधून ती पुन्हा एकदा नायिका म्हणून प्रेक्षकांची मने जिंकते का, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. अफेअरचं भांडं फुटलं! पार्टीत झळकले जीवा-काव्याचे फोटो; लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत वर्षपूर्तीला मोठा स्फोटक ट्विस्ट







