ADVERTISEMENT

Tharala Tar Mag : महिपतची २२ वर्षांनंतर कबुली! प्रतिमा-सायलीच्या जीवावर बेतलेलं संकट; मालिकेत धडकी भरवणारा ट्विस्ट

tharala tar mag mahipat confession twist promo update : 'ठरलं तर मग' मालिकेत अखेर तो क्षण आला आहे ज्याची प्रेक्षक तीन वर्षांपासून वाट पाहत होते. महिपतने २२ वर्षांपूर्वीचा भयंकर गुन्हा मान्य करत प्रतिमावर बंदूक रोखली असून सायलीचाही जीव धोक्यात आला आहे. पुढे काय होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
tharala tar mag mahipat confession twist promo update

tharala tar mag mahipat confession twist promo update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा स्फोटक कलाटणी देणारा प्रोमो समोर आला असून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. जवळपास तीन वर्षे चाहत्यांनी ज्या सत्याच्या उलगड्याची वाट पाहिली, तो क्षण अखेर मालिकेत दाखवला गेला आहे. २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रहस्यमय अपघाताचं ओझं घेऊन फिरणाऱ्या महिपतने आता स्वतःच्या तोंडून तो गुन्हा मान्य केल्याचं दृश्य नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.

प्रोमोमध्ये प्रतिमाला मंदिरात येणाऱ्या चक्करमुळे सायलीला तिच्या आईच्या जुन्या जखमा पुन्हा उघडू लागतात. प्रतिमा महिपतला पाहताच अस्वस्थ होते हे सायलीच्या लक्षात आल्यानंतर अर्जुनलाही संशय येतो की २२ वर्षांपूर्वीचा अपघात साधा नव्हता. यानंतर अर्जुन आणि सायली एक निनावी कॉल करून महिपतला त्या दुर्घटनेच्या जागी बोलावतात. तिथे दाखवलेला ट्रक ड्रायव्हर बाबूचा फोटो पाहताच महिपतचं समाधान ढासळतं आणि त्याच्या मनात भीतीचं वादळ उठतं.

मालिकेत महिपतने त्यावेळी अपघात घडवून आणण्यासाठी स्वतःच्याच माणसांना पैसे दिल्याचं उघड होतं. अपघातानंतर तो नियोजित स्थळी पोहोचून प्रतिमावर जळत्या लाकडाने हल्ला करतो, ज्यात तिचा चेहरा भाजतो. या भयंकर भूतकाळाचा उलगडा जवळ-जवळ दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांपासून लपून राहिला होता.

आणि आता पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकल्यानंतर महिपत प्रतिमावर बंदूक रोखत म्हणतो— “हो, मीच घडवला होता तो अपघात! आणि आज, २२ वर्षांनी का होईना… तुला माझ्याच हातून मरावं लागेल!” हे ऐकून सायली आईच्या संरक्षणासाठी पुढे येते, पण त्याच क्षणी महिपतचा माणूस सायलीवरही बंदूक रोखतो. मायलेकींच्या हातात असलेली जळती लाकडं आणि समोर गोळीबाराचा धोका—या टप्प्यावर अर्जुन दूरून हे सगळं पाहत असतानाच अचानक बंदुकीचा आवाज घुमतो.

गोळी नेमकी कोणाला लागली? या संघर्षात कोणाचं आयुष्य धोक्यात जाणार? याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू असून सोशल मीडियावर अनेकांनी सायलीला इजा होण्याची शक्यता मांडली आहे. मात्र, सत्य ४ आणि ५ डिसेंबरच्या भागातच समोर येईल.

हे पण वाचा.. प्राजक्ता गायकवाडच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल; लग्नाची तयारी सुरू

Tharala Tar Mag मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संपूर्ण टीमचं कौतुक केलं असून या ट्विस्टमुळे मालिकेचा थरार आणखी वाढणार हे निश्चित आहे.

हे पण वाचा.. सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर चा संताप; चाहत्यांच्या गर्दीमुळे थांबला विधी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

tharala tar mag mahipat confession twist promo update