ADVERTISEMENT

अमृता खानविलकर ने वाढदिवशी केला खास खुलासा; त्या पोस्ट मुळे वाढली चाहत्यांची उत्सुकता

amruta khanvilkar new announcement : अमृता खानविलकर ने तिच्या वाढदिवशी ‘अमुल्य बाय अमृता’ची घोषणा करत चाहत्यांच्या मनात नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. जानेवारी 2026 मध्ये ती कोणती खास गोष्ट घेऊन येणार आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
amruta khanvilkar new announcement

amruta khanvilkar new announcement : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही नेहमीच तिच्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि सोशल मीडियावरील आकर्षक उपस्थितीमुळे चर्चेत असते. 23 नोव्हेंबरला अभिनेत्रीने तिचा वाढदिवस कुटुंबीयांच्या उपस्थितीत साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमृता खानविलकर ने चाहत्यांसोबत एक खास अपडेट शेअर करत आनंद दुप्पट केला, मात्र यावेळी तिच्या घोषणेमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अमृता खानविलकर ने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती लिहिते की, चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे तिचा दिवस अधिकच खास झाला. चाहत्यांचा मिळणारा विश्वास आणि साथ हेच तिच्या प्रवासाचं खरं बळ असल्याचं तीने सांगितलं. याच भावनेतून ती नव्या वर्षात एक नवीन पाऊल टाकत असल्याचा खुलासा करताना Amruta Khanvilkar म्हणते की, जानेवारी 2026 मध्ये ती तिच्या मनाला अगदी जवळची गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या नव्या प्रोजेक्टचं नाव आहे – ‘अमुल्य बाय अमृता’.

परंतु ‘अमुल्य बाय अमृता’ नेमकं काय? हे अभिनेत्रीने उघड न केल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांचा अंदाज आहे की अमृता खानविलकर स्वतःचा फॅशन किंवा ब्यूटी ब्रँड लॉन्च करणार आहे, तर काहींच्या मते हा एक वैयक्तिक प्रोजेक्ट किंवा प्रोडक्शनशी संबंधित नवा प्रयोग असू शकतो. सोशल मीडियावर या नावाबद्दल अनेक तर्क-वितर्क रंगत असून, अभिनेत्रीने रहस्य अजून गुप्त ठेवूनच चाहत्यांना थोडंसं कोड्यात टाकलं आहे.

अमृता गेल्या काही वर्षांत मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत अनेक दमदार प्रोजेक्ट्सचा भाग राहिली आहे. तिच्या कामगिरीने आणि बहुमुखी प्रतिभेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिचा हा नवा प्लॅन कशाशी संबंधित आहे, याची प्रतिक्षा आता सर्वांनाच लागली आहे.

हे पण वाचा.. National Crush बनल्यानंतर गिरिजा ओक च्या आयुष्यात बदलांची चाहूल; “दरवाजा उघडतानाही आता…” म्हणत अभिनेत्रीचा नवीन खुलासा

अमृताच्या या पोस्टनंतर प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत केळकर, गौरी नलावडे, नंदिता पाटकर यांसह अनेक सहकलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. आता ‘अमुल्य बाय अमृता’मागचं रहस्य उलगडण्यासाठी सर्वांचे डोळे जानेवारी 2026 वर खिळले आहेत. अमृता खानविलकर नेमकं काय घेऊन येते, हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरेल.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag : चुकीचा फोटो, बदललेले सॅम्पल्स आणि महिपतचं सावट अर्जुनच्या शोधात समोर आलं सत्य!

amruta khanvilkar new announcement