aishwarya sharma breaks silence post : टीव्ही इंडस्ट्रीत कमी काळात लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) हिच्या खासगी आयुष्याबद्दल गेल्या काही दिवसांत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. नील भटसोबतच्या तिच्या नात्याविषयी सुरू झालेल्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर जलदगतीने पसरत आहेत. नेमकं काय घडतंय, याची अधिकृत पुष्टी कोणत्याच बाजूकडून झालेली नसली, तरी या सर्व गोंधळामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा मोठा फटका बसत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर ऐश्वर्या शर्मा हिनं इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं तिच्याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्यांचा आणि लोकांच्या अंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. “लोक माझ्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढत आहेत. मी काय करते, कशी आहे, याचा विचार न करता काहीही बोललं जातंय. ‘हे कर्म आहे’ अशा कमेंट्स पाहूनही गप्प राहावं लागतं,” असं ती म्हणाली.
अभिनेत्री पुढे नमूद करते की, सेटवर काम करणाऱ्या सहकलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वजण तिच्या वागणुकीबद्दल सकारात्मक मत देऊ शकतील. “मी कधीच कुणाला त्रास दिलेला नाही. कुणाची निंदाही केली नाही. माझं प्रोफेशनल वर्तन कायम ठेवलंय,” असे सांगत तिने पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीवर नाराजी व्यक्त केली.
ऐश्वर्या शर्मा हिच्या म्हणण्यानुसार, साखरपुड्यानंतरपासूनच तिला सतत ट्रोल केलं जात आहे. अनेक अनोळखी व्यक्ती तिच्या नावाशी निगडित खोट्या व्हिडिओज आणि लिंक पाठवतात, ज्यामुळे मानसिक त्रास वाढतो. “मी शांत राहण्याचा निर्णय घेतला, कारण बोललं की माझ्याच शब्दांचा गैरसमज केला जातो. पण मी शांत आहे म्हणजे मी चुकीची आहे, असा अर्थ नाही,” असे ती ठामपणे म्हणाली.
तिच्या शेवटच्या शब्दांतून तिने ट्रोलर्सना थेट संदेश दिला—“खोटी माहिती पसरवण्याआधी थोडा विचार करा. मानसिक आरोग्याबद्दल बोलणारेच इतरांना दुखावतात, हे दुर्दैवी आहे. मी स्वाभिमानासाठी उभी राहीन.”
हे पण वाचा.. सूरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घराचा गृहप्रवेश; प्रशस्त बंगल्याची झलक पाहून चाहते भारावले
ऐश्वर्या शर्मा ची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही तिला साथ देत तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे पुढील काळात स्पष्ट होईल, मात्र तिच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग : पूर्णा आजीचा जीव धोक्यात; सदाशिव-मैनावतीची चोरीचा डाव फसला, सायलीने दाखवली अफाट चातुर्य!
aishwarya sharma breaks silence post










