ADVERTISEMENT

सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख ठरली! पण यामुळे लाडकी अंकिता वालावलकर राहणार गैरहजर Suraj Chavan

Suraj Chavan ‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरांत पोहोचलेला सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्याच्या या खास दिवशी त्याची लाडकी बहीण अंकिता वालावलकर उपस्थित राहू शकणार नाही, आणि यामागचं कारण तिनं स्वतः सांगितलं आहे.
Suraj Chavan

Suraj Chavan Wedding: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण सध्या त्याच्या लग्नाच्या तयारीमुळे चर्चेत आहे. शोमध्ये आपल्या मनमोकळ्या स्वभावाने आणि हसतमुख वृत्तीने सर्वांना भावलेला सूरज आता आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीची ओळख चाहत्यांना करून दिली असून तिचं नाव आहे संजना.

सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह सोहळा २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून लग्नविधींची सुरुवात २८ नोव्हेंबरपासून होणार आहे. हा सोहळा पुण्याजवळील सासवड येथे मोठ्या थाटामाटात होईल अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सूरजनं अंकिता वालावलकरच्या घरी केळवण समारंभ आयोजित केला होता. तिथेच त्याने संजनाला अधिकृतपणे सर्वांसमोर आणलं आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.

अंकिता आणि सूरज यांचं नातं नेहमीच भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक राहिलं आहे. सूरजच्या लग्नाच्या तयारीपासून ते खरेदीपर्यंत अंकिता त्याच्यासोबत होती. कपडे, साड्या, दागिने—सर्व गोष्टींची जबाबदारी तिने मनापासून सांभाळली. मात्र, एवढं असूनही ती लग्नाच्या दिवशी उपस्थित राहू शकणार नाही हे ऐकून अनेक चाहते निराश झाले आहेत.

अंकितानं याबाबत स्पष्ट सांगितलं की, “नेमकं सूरजच्या लग्नाच्याच दिवशी आमच्या जवळच्या कुटुंबीयांचं लग्न नागपूरला आहे. त्यामुळे वेळ जुळवणं शक्य नाहीये. सूरज मला वारंवार बोलावतोय, पण प्रवास खूप लांब असल्याने येणं कठीण आहे. मात्र लग्नाआधी नक्की भेटेन आणि नंतरही त्याला भेटायला जाणार आहे.”

लग्नाच्या अडीच वर्षांनी अभिनेत्री अमृता पवार बनली आई; लेकाच्या बारशात केला नावाचा सुंदर खुलासा!

तिच्या या प्रामाणिक उत्तरावरून चाहत्यांना तिचं सूरजवरील प्रेम पुन्हा जाणवलं आहे. आता प्रेक्षकांचं लक्ष सूरजच्या या बहुचर्चित Suraj Chavan Wedding सोहळ्याकडे लागलं आहे, आणि ‘बिग बॉस मराठी’मधील कोणकोणते कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहणार याची उत्सुकता अधिक वाढली आहे.